युक्रेनमधून परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

रशियाने युक्रेनविरोधात युध्द पुकारल्याने हजारो भारतीय नागरिक अडकून पडले असून, त्यांना मायदेशी आणले जात आहेत.
युक्रेनमधून परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय
ANI
Published on
Updated on

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनविरोधात युध्द (Russia -Ukraine War) पुकारल्याने हजारो भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. युक्रेनमधून भारतीयांना मायदेशी आणले जात असून, यातील बहुतांश विद्यार्थी आहेत. आता मोदी सरकारने (Modi Government) युक्रेनमधून परतणाऱ्या भारतीयांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. (Russia Ukraine War Update)

युक्रेनमधून परतणाऱ्या भारतीयांना आणण्यासाठी सरकारकडून मोठी पावले उचलली जात आहेत. यासाठी आता सरकारने कोरोनाविषयक (Covid-19) नियमावलीमध्ये बदल केला आहे. पूर्व युरोपीय देशांतून परतणाऱ्या भारतीयांना आता या नियमावलीमध्ये मोठी सूट देण्यात आली आहे. त्यांना तेथून विमानाने येताना आरटी-पीसीआर अहवाल आणि कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधनकारक असणार नाही. एअर सुविधा पोर्टलवर त्यांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता असणार नाही. आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह अहवाल सादर न करणारे आणि कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांची भारतात परतल्यानंतर चाचणी करण्यात येईल. याचबरोबर त्यांना भारतात परतल्यानंतर 14 दिवस स्वत:च्या प्रकृतीवर लक्ष ठेवावे लागेल. आजपर्यंत युक्रेनमधून 1 हजार 156 भारतीय परतले आहेत. यातील एकाही भारतीयाला विलगीकरणात पाठवण्यात आलेले नाही.

युक्रेनमधून परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय
राजकारण तापलं! भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय मंत्री, आमदार-खासदारांसह राजभवन गाठलं

भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा (Operation Ganga) राबवले जात आहे. आतापर्यंत याअंतर्गत शेकडो भारतीयांना परत आणण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेत चार केंद्रीय मंत्र्यांना या मोहिमेवर पाठवण्याचा निर्णय़ घेतल्याचे समजते. हे मंत्री युक्रेनमधील (Ukraine) शेजारीत देशांमध्ये जाऊन भारतीयांना परत आणण्यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर मदत करतील, अशी माहिती सुत्रांनी दिली.

युक्रेनमधून परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय
भाजपची कोंडी! विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदही नाही

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी (Hardeep Puri), ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia), किरेन रिजिजू (Kiren Rijiju), आणि जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह (V. K. Singh) या चार मंत्र्यांचा यामध्ये समावेश असल्याचे समजते. दरम्यान, सोमवारी २४९ भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले. आतापर्यंतचे हे पाचवे विमान भारतात उतरले आहे. या सर्वांना रोमानिया येथून आणण्यात येत आहे. तसेच आणखी विमान उड्डाणांचे नियोजन करण्यात आले आहे. युक्रेनची राजधानी कीव्हमधील साप्ताहिक कर्फ्यूही हटवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे भारतीय दुतावासाने युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना रेल्वे स्थानकांवर जाण्यास सांगितले आहे. युक्रेन सरकारकडून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना युक्रेनबाहेर पडण्यातील अडथळे काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com