Congress on Shivsena Survey : २०२४ नंतर 'एक होते शिंदे' अशी स्टोरी लिहिली जाईल; शिवसेनेच्या सर्व्हेवर काँग्रेसची टीका

Shivsena vs Congress : लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार, भरत गोगावलेंचा विश्वास
Shivsena, Congress
Shivsena, CongressSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Survey is Fake : राज्यातील सर्वच प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर आज मंगळवारी (ता. १३) झळकलेली जाहीरात विशेष लक्ष वेधून घेत आहे. या जाहिरातीत देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असा उल्लेख आहे. आतापर्यंत देशात नरेंद्र-महाराष्ट्रात देवेंद्र अशी घोषण होत होती. आता मात्र देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात होत आहे. या जाहिरातीमुळे राज्यात आता चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)

या जाहिरातील शिवसेना (Shivsena) आणि भाजपला जनतेची पसंती असल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यातील जनतेने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना पसंती दिल्याचाही दावा केला आहे. ही जाहीरात एका खासगी वृत्तवाहिनीची असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. या जाहिरातीवरून काँग्रेसने शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शिवसेनेने खोटा सर्व्हे केल्याचे म्हटले आहे.

Shivsena, Congress
Eknath Shinde News : 'देशात मोदी-महाराष्ट्रात शिंदे', मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेना फडणवीसांपेक्षा जास्त पसंती? ; शिवसेनेचा सर्व्हे..

अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले, "आपणच सर्व्हे करून घ्यायचा आणि आता मला जनतेची कशी पसंती आहे, हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न खोटा असून तो मागच्या काही निवडणुकांमध्ये दिसून आला. येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी लोकसभेच्या ४२ जागा जिंकेन. तर विधानसभेच्या २०० हून अधिक जागा महाविकास आघाडीच्या असतील. २०२४ नंतर 'एक होते शिंदे' ही स्टोरी महाराष्ट्रात लिहिली जाईल."

काँग्रेसच्या या टीकेला शिवसेनेकडून उत्तर देण्यात आले आहे. हा सर्व्हे म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाला जनतेने दिलेली पावती असल्याचे शिवसेननेचे प्रवक्ते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी सांगितले. गोगावले म्हणाले, "आतापर्यंत आम्ही कुणालाही पैसे देऊन सर्व्हे करून घेतले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम सर्वश्रृत आहे. शिंदे कुठे घरात बसून काम करतात, ते लोकांना भेटत नाहीत, असे कुठेही नाही. सरकार आल्यापासून शिंदे सरकारने घेतलेल्या ठोस निर्णयांकडे पाहणे गरजेचे आहे. एका वृत्तवाहिनीने लोकांना काही प्रश्न विचारून हा सर्व्हे केला आहे. त्यात आमचा काही हात नाही."

Shivsena, Congress
Ajit Pawar News : अजितदादांची गिरीश महाजनांनी केली स्तुती; म्हणाले, "राज्यात अजितदादा सरसच पण..."

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने काही आमदार नाराज आहेत. या जाहिरातीच्या माध्यमातून या आमदारांवर दबाब निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचाही चर्चा आता सुरू झाली आहे. यावर गोगावले म्हणाले, "राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार यात काही वाद नाही. सध्या त्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करण्यचा प्रयत्न सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेतील आमदारांमध्ये कुठेही कुरबूर नाही. आता एक घर म्हटल्यावर भांड्याला भांडे लागणारच. हे सरकार पडण्यासाठी जे कुणी देव पाण्यात बुडवून बसलेले आहेत त्यांचे देव काही वर येऊ देणार नाहीत."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com