Eknath Khadse News : राष्ट्रवादीचं ठरलं; एकनाथ खडसेंची विधान परिषदेच्या गटनेतेपदी वर्णी

Ncp News : एकनाथ खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव...
Eknath Khadse News
Eknath Khadse News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी नियुक्तीचं पत्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र देण्यात आले होते. आता त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खडसे (Eknath Khadse ) यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे. खडसे यांच्या नियुक्ती करत राष्ट्रवादीने एकप्रकारे भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

Eknath Khadse News
Assembly Session: रासायनिक खते खरेदी करताना जात सांगावी लागणार; विरोधक आक्रमक; मुनगंटीवारांनी लढवला किल्ला

विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसेंच्या माध्यमातून जळगावमध्ये राष्ट्रवादीला अधिक बळ मिळेल आणि आगामी निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल, हे सर्व गणित पाहता त्यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.

Eknath Khadse News
Imtiyaz Jaleel News : मोठी बातमी! खासदार इम्तियाज जलील अडचणीत; छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल

तसेच भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय संघर्ष अनेकवेळा जळगावमध्ये पाहायला मिळतो. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानपरिषदेवर आमदार झाले. त्यानंतर आता त्यांच्यावर राष्ट्रवादी मोठी जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com