मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी काल भावनिक आवाहन केले. "फुटलेल्या आमदारांनी मला सांगावे, मी पद सोडायला तयार आहे मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असेच ठेवा,' असे आवाहन करत उध्दव ठाकरे यांनी कालच वर्षावरील मुक्काम मातोश्रीत हलवला आहे. (eknath shinde latest news)
अचानक बंड करण्यापूर्वी शिंदे यांचा शिवसेनेच्या नेत्यांसोबत त्यांचा वाद झाला होता का, याविषयी सध्या चर्चा रंगली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्यावेळी या वादाची ठिणगी पडली असल्याची माहिती समोर येत आहे.
शिंदेंनी बंड पुकारण्याच्या दोन दिवस आधीच एक पक्षांतर्गत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांचा राज्याचे आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत शाब्दिक वाद झाला होता.
शिवसेनेकडे असणारी अतिरिक्त मतं काँग्रेसला देण्याच्या मुद्द्यावरुन या नेत्यांमध्ये वाद झाला. शिवसेनेची अतिरिक्त मतं काँग्रेससाठी वापरण्याला शिदेंचा विरोध होता. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांना आवश्यक ती मतं मिळाली आणि ते विजयी झाले. पण काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले. दहाव्या जागेसाठी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पहायला मिळाला आणि भाजपाने पाच जागा जिंकल्या.
राज्यामध्ये सुरु असणाऱ्या घडामोडी आणि राज्य सरकारच्या कारभारावर शिंदे हे मागील काही महिन्यांपासून नाराज होते. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही कल्पना देण्यात आली होती, असेही काल शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.
एकाच उमेदवाराला विजयी करण्याइतकी मतं असताना काँग्रेसने विधान परिषदेच्या रिंगणात दोन उमेदवार उतरवले होते. काँग्रेसने जारी केलेल्या यादीमध्ये हांडोरेंचं नाव हे पहिला उमेदवार म्हणून होतं. अनेकांना हांडोरे विजयी होतील, असं वाटलं होतं आणि दुसरे उमेदवार भाई जगताप यांना विजय मिळणं कठीण आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.