Eknath Shinde : शिंदेंच्या मतदारसंघात फूटपाथवर अतिक्रमण

Sanay Raut, Sanjay Kelkar : फूटपाथवर कंटेनर ठेवून खासगी कार्यालय थाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप
Thane
ThaneSarkarnama
Published on
Updated on

Thane Political News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील मतदारसंघातच एका फूटपाथवर कंटेनर ठेवून कार्यालय थाटण्यात आले आहे. या प्रकारामुळे ठाणेकर आश्चर्य व्यक्त होत असतानाच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी सोशल मीडियावरून या प्रकाराला वाचा फोडल्यामुळे वातावरण तापले आहे.

विशेष म्हणजे अलीकडेच भाजपचे (BJP)आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) यांनीही असाच आरोप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर केला होता. त्यामुळे काहीही झाले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'संजय' पिच्छा पुरवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Thane
Shrikant Shinde News : कल्याणचं मैदान गाजणार; होमपिचवर श्रीकांत शिंदे कुणाची 'विकेट' घेणार ?

ठाकरे गटाचे संजय राऊत रोज एकनाथ शिंदेवर (Eknath Shinde) टीकेचे बाण सोडत असतात. अशातच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी एक गंभीर आरोप केला. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्याने ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corportation) आरक्षित भूखंडावर कंटेनर शाखा उभारल्याचा आरोप केळकर यांनी केला होता.

आता हे कमी म्हणून की काय, त्यानंतर 24 तासांतच ठाकरे गटाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनीही शिंदेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात फुटपाथवर लोखंडी कंटेनरमध्ये खासगी कार्यालय थाटण्यात आरोप त्यांनी केला आहे. एवढेच नाही तर हा कंटेनर शिंदे यांच्या संबंधित व्यक्तीचा असल्याने त्याच्यावर आम्ही कारवाई करू शकत नाही, असे उत्तर ठाणे महापालिका प्रशासनाने दिल्याची माहिती घाडीगावकर यांनी दिली आहे.

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात वागळे इस्टेटमधील आयटीआयच्या अगोदर ठाणावाला मारुती शोरूम आहे. त्या फूटपाथवर लोखंडी कंटेनर ठेवून खासगी कार्यालय थाटण्यात आले आहे. या कंटेनरला ठाणे महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी दिलेली नाही, असेही सांगण्यात आले आहे.

याबाबत कारवाई करून ती माहिती प्रसिद्ध करावी, आणि आम्हाला लेखी कळवावे, अशी विनंती ठाणे जिल्हा उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक घाडीगावकर यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे, राज्याचे मुख्य सचिव, ठाणे पोलीस आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना ईमेल पाठवले आहेत.

ही कारवाई करणे शक्य नसेल तर सर्वच ठाणेकरांना अनधिकृत बांधकामे करण्यासाठी आणि अनधिकृतपणे असे कंटेनर जागोजागी ठेवून कार्यालयात टाकण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी घाडीगावकर यांनी केली आहे.

(Edited by Avinash Chandane)

Thane
Shivsena Container Branch : ठाणे मनपाच्या आरक्षित जागेवर शिवसेनेची 'कंटेनर शाखा' ; भाजप आमदाराने आयुक्तांना धरले धारेवर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com