Eknath Shinde: शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा दणका दिला आहे. आघाडी सरकारमधील तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची मंजूर केलेल्या पर्यटन विभागाच्या हजारो कोटीं रुपयांच्या कामांना शिंदे-फडणवीस सरकारनं स्थगिती दिली आहे. (Shinde government slams Aaditya Thackeray news)
राज्यात सत्तातर झाल्यानंतर शिंदे सरकारनं जुलैमध्येच पर्यटन विभागाच्या योजनांना स्थगिती देण्यास सुरवात केली होती. आता आदित्य ठाकरे यांनी मंजूर केलेली 381 कोटी रुपयांची प्रादेशिक पर्यटन विकास योजना सुरू ठेवण्याबाबत शिंदे सरकार संभ्रमात आहे.
जुलैमध्ये सत्तेत येताच शिंदे सरकारने 2022-23 सोबतच गेल्या वर्षीच्या कामांवरील स्थगिती उठवून निधीही मंजूर केला होता. मात्र,निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याआधीच पुन्हा एकदा या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते. शिंदे सरकारने यापूर्वीचा आदेश रद्द करुन नवी अध्यादेश काढला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी स्मृतीस्थळी गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले. यामुळे शिंदे गटात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या असून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचेच शुद्धीकरण करण्याची गरज असून त्यांना गोमुत्राने स्नान करावे लागेल, असा टोला शिंदे गटाने लगावला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी एकनाथ शिंदे आणि काही मंत्री व शिंदे गटातील आमदार शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर उद्धव बाळासाहेब शिवसेनेतील शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडून स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. हा प्रकार हास्यास्पद असल्याचा टोला शिंदे गटाने लगावला आहे. स्वातंत्रवीर सावरकर यांना माफीवीर म्हणणाऱ्या राहुल गांधी यांना आदित्य ठाकरे यांनी मिठी मारली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचेच शुद्धीकरण करण्याची गरज असल्याचा टोला शिंदे गटाने लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.