एकनाथ शिंदे गटाने नाव आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला हे तीन पर्याय दिले

बाळासाहेबांचे नाव वापरण्यालाच ठाकरे गटाचा आक्षेप आहे. त्यामुळे त्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्याकडून निवडणूक आयोगाला तीन नावे आणि तीन चिन्हे सादर करण्यात आली आहेत. यामध्ये शिंदे यांनीही ठाकरे यांच्या प्रमाणे त्रिशूळ आणि उगवत्या सूर्याची मागणी केली आहे. तिसरा पर्याय म्हणून गदा देण्यात आली आहे. नावातही शिंदे यांनी बाळासाहेबांचे नाव घेतले आहे, त्यामुळे कोणते नाव कुणाला मिळते, हे पाहावे लागेल. (Eknath Shinde group gave these three options to Election Commission for name and symbol)

एकनाथ शिंदे गटाकडून पक्षाच्या नावाचे ३ पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. त्यात शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची या नावांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडूनही शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव अगोदरच देण्यात आले आहे. त्यामुळे ते नाव बाद होण्याची शक्यता आहे. उर्वरीत दोन नावांपैकी एक नाव शिंदे गटाला मिळू शकते. मात्र, बाळासाहेबांचे नाव वापरण्यालाच ठाकरे गटाचा आक्षेप आहे. त्यामुळे त्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Eknath Shinde
कुणाच्या इशाऱ्यावर नाचतोय, याचं भान त्यांना राहिलं नाही : शिवसेनेचा शिंदे गटाला टोला

दुसरीकडे, शिंदे यांनी निवडणूक चिन्हासाठी त्रिशूल, उगवता सूर्य आणि गदा हे तीन पर्याय निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. विशेष म्हणजे यापैकी पहिले दोन पयार्य ठाकरे यांच्याकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे ही दोन्ही चिन्हे या दोन्ही गटाला मिळण्याची शक्यता कमी आहे. उर्वरीत चिन्हे दोन्ही गटाला मिळू शकतात.

Eknath Shinde
माझ्या विजयसिंहला एकदा निवडून द्या : शिवाजीराव पंडितांचे भावनिक आवाहन

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे ही तीन नावे निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली आहेत. तर चिन्हांसाठी त्रिशूल, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ह्या चिन्हांचा पर्याय दिला आहे. त्यामुळे कोणाला कोणते चिन्हे आणि नाव मिळते, हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com