कुणाच्या इशाऱ्यावर नाचतोय, याचं भान त्यांना राहिलं नाही : शिवसेनेचा शिंदे गटाला टोला

धनुष्यबाण या चिन्हाबाबत सुनावणी, छाननी न करता केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे, त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Arvind Sawant
Arvind SawantSarkarnama

मुंबई : धनुष्यबाण या चिन्हाबाबत सुनावणी, छाननी न करता केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) निर्णय घेतला आहे, त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, असे शिवसेनेचे (shivsena) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी सांगितले. तसेच, कुणाच्या इशाऱ्यावर नाचतोय, याचे भान त्यांना राहिलेले नाही, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) लगावला. (Shiv Sena went to Delhi High Court against Election Commission for this reason : Arvind Sawant)

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या चिन्ह गोठविण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर माध्यमाशी बोलताना खासदार सावंत बोलत होते. ते म्हणाले की, मुळात एकनाथ शिंदे आणि १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा बाकी असताना निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. अपात्रतेची टांगती तलवार त्यांच्यावर असताना त्यांचे म्हणणं कसं काय ऐकून घेता, असा सवालही त्यांनी केला.

Arvind Sawant
माझ्या विजयसिंहला एकदा निवडून द्या : शिवाजीराव पंडितांचे भावनिक आवाहन

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ज्या प्रमाणे पक्षाच्या विरोधात भूमिका घेणारे शरद यादव यांच्यावर कारवाई केली होती. त्याप्रमाणे शिवसेनेने शिंदे गटाच्या विरोधात कारवाई केली आहे, असेही अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले.

Arvind Sawant
मुलायम सिंहांच्या निधनाने पंतप्रधान मोदी भावूक; म्हणाले, ‘मनाला वेदना झाल्या...’

खासदार सावंत म्हणाले की, निवडणूक आयोगाला आम्ही पक्षासाठी तीन नावे आणि तीन चिन्हे प्राधान्य क्रमानुसार दिली आहेत. त्रिशूळ हे शिवाचे चिन्ह आहे. आमच्या विचारांशी पूरक आहे, त्यामुळे आम्ही ते चिन्ह घेतले आहे. आमच्याच चिन्हावर शिंदे गटाकडून दावा सांगितला जात आहे. ती काळी मांजरे आहेत, आडवीच जाणार, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला. आम्ही पहिल्यांदा बाळासाहेबांचे नाव सादर केले आहे. ते नाव भावनिक नव्हे; तर न्यायीकही आहे.

Arvind Sawant
2003 मध्ये शिंदेंबाबत चूक झाली; राऊतांची खंत : ठाण्यात ठाकरेंच्या यात्रेला जोरदार प्रतिसाद

आम्ही चिन्ह आणि नावे पाठवली आहेत. निवडणूक आयोगाने लवकर निर्णय घ्यावा, जे प्राधान्य हवं आहे, त्यापद्धतीने दिलं आहे, त्यामुळे लवकर निर्णय द्यावा. जसा पक्ष आहे तस ते चिन्ह शोभलं पाहिजे त्रिशूल शंकराचे शस्त्र आहे उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणार, याबाबत मी बोलणं योग्य नाही. उद्धवजी स्वतः बोलले पाहिजेत. उद्धवजी पंतप्रधान झाले, तर सर्वात जास्त आनंद मलाच होईल. राष्ट्रीय राजकारणाबाबत आता बोलणे योग्य नाही. नेतृत्वाचे नाव नंतरही ठरवू शकतो, असेही सावंत यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com