Maharashtra Politics : ठाकरेंच्या खासदाराला एकनाथ शिंदे भेटले! 'मातोश्री'ही सावध, तातडीने विश्वासू माणूस पाठवला, नेमकं काय घडलं?

Eknath Shinde Meet MP Sanjay Patil : मंगळवारी संजय पाटील यांची भेट एकनाथ शिंदे यांनी घेतली.त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील संजय पाटील यांना फोन करत त्यांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूस केली.
Uddhav Thackeray -Eknath Shinde
Uddhav Thackeray -Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदार असल्याची चर्चा सातत्याने होत असते. ऑपरेशन टायगर सक्रीय असल्याचे शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांकडून सांगण्यात येते. त्यातच मुंबईमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांची भेट एकनाथ शिंदेंनी घेतल्याने चर्चांना उधाण आले.

एकनाथ शिंदेंची भेट ही केवळ संजय पाटील यांच्या पत्नीची विचारपूस करण्यासाठी होती, असे समोर आले आहे. खासदार पाटील यांच्या पत्नीचा अपघात झाला आहे. त्यांच्यावर मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या विषयी माहिती मिळताच काल एकनाथ शिंदेंनी रुग्णालयात जात संजय दिना पाटील यांची भेट घेत त्यांच्या पत्नीची तब्येतीची विचारपूस केली.

खासदार ठाकरेंचा मात्र शिंदेंनी वेळात वेळ काढून त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर 'मातोश्री'देखील सावध झाली. मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांना फोन करत त्यांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच उद्धव ठाकरेंची विश्वासू मिलिंद नार्वेकर आणि सचिन आहिर यांनी रुग्णालयात जात संजय पाटील यांची भेट घेतली.

Uddhav Thackeray -Eknath Shinde
Operation Tiger Politics: मंत्री संजय शिरसाट ऑपरेशन टायगर बाबत सुचक बोलले, म्हणाले, "तेव्हा खेळ खल्लास!"

'ऑपरेशन टायगर' अ‍ॅक्टीव्ह

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी नुकतेच जाहीर कार्यक्रमात वक्तव्य केले की ते सध्या पक्षासोबत आहेत. मात्र, पुढे काय होईल हे माहिती नाही. त्यामुळे ऑपरेशन टायगरबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरेंचे सहा ते सात खासदार हे शिंदेंच्या संपर्कात असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, नंतर स्वतः शिंदेंकडून यामध्ये तथ्य नसल्याचे सांगितले होतेय.

Uddhav Thackeray -Eknath Shinde
Arvind Sawant Angry : विकली जाणारी औलाद नाही, ठाकरेंच्या खासदारानी सुनावलं; 'ऑपरेशन टायगर'ची हवाच काढली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com