Eknath Shinde On Raj-Uddhav Rally : राज-उद्धव ठाकरेंची एकत्रित सभा होताच एकनाथ शिंदे 'अ‍ॅक्टिव्ह', प्रतिक्रिया देताना म्हटले, 'खुर्चीप्रेमी, वेडापीसा...'

Eknath Shinde Raj Thackeray Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे म्हणाले, उबाठाने मराठी माणूस मुंबईचा बाहेर का फेकला गेला. मराठी टक्का कमी कमी का होत गेला. अंबरनाथ, वांगणी परिसरात का गेला याचे उत्तर दिले गेले पाहिजे.
Eknath Shinde On Raj-Uddhav Rally
Eknath Shinde On Raj-Uddhav Rallysarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde : मराठीच्या मुद्यावर आज वरळी डोममध्ये राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांची एकत्रित सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार प्रहार केला. मराठीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. उद्धव ठाकरेंच्या भाषणाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'रुदाली' म्हणून खिल्ली उडवली. आता, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने ठाकरे बंधुंच्या मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधू एकत्रित येत असताना शिदें देखील अॅक्टिव्ह झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, उबाठाने मराठी माणूस मुंबईचा बाहेर का फेकला गेला. मराठी टक्का कमी कमी का होत गेला. अंबरनाथ, वांगणी परिसरात का गेला याचे उत्तर दिले गेले पाहिजे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणावर बोलताना शिंदे म्हणाले, एकाच भाषणातून मराठी प्रेम दिसले तर दुसऱ्याच्या भाषणातून सत्ता आणि मळमळ दिसली. माझ्यावर तर सातत्यावर टीका करत असतात मी कामातून उत्तर दिले. म्हणून मी मुख्यमंत्री झालो तसेच विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला येवढे मोठे यश मिळाले.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या अधिकृत ट्विटरवरून राज-उद्धव ठाकरेंच्या एकत्रित सभेनंतर एक उपहासात्मक कविता शेअर करण्यात आली. या कवितून राज ठाकरेंना स्वाॅफ्ट काॅर्नर दाखवण्यात आला आहे. तर, उद्धव ठाकरेंसाठी जहरी शब्द वापरण्यात आले आहे.

या कवितेमधून राज ठाकरेंसाठी प्रबोधक, उजवा, मराठी प्रेमी प्रगल्भ अशी विशषणे वापरण्यात आली आहेत. तर, उद्धव ठाकरेंसाठी प्रक्षोभक,डावा, खुर्चीप्रेमी, सूड, वेडापिसा असे शब्द वारण्यात आले आहे.

Eknath Shinde On Raj-Uddhav Rally
Sushma Andhare : 'जिहादी सभा’ म्हणाल्यावर…सुषमा अंधारेचा नितेश राणेंना करारा जवाब! म्हणाल्या, 'छोट्या....'

शिवसेनेने पोस्ट केलेली कविता जशीच्या तशी

एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक

एक उजवा, दुसरा डावा

एक धाकला असून थोरला

दुसरा थोरला असून धाकला

एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी

एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड!

एक मराठीचा पुरस्कर्ता, दुसरा तिरस्कर्ता

एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा

एकाचा मराठीचा वसा

दुसऱा भरतोय खिसा

एकाचा स्वतंत्र सवतासुभा

दुसरा नुसताच आयतोबा!

Eknath Shinde On Raj-Uddhav Rally
Ashok Patil Dongaonkar : सरपंच ते राज्यमंत्री असा राजकीय प्रवास करणारे अशोक पाटील डोणगावकर यांचे निधन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com