
Mumbai News : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (ता.5) वरळीमध्ये विजयी मेळावा घेतला. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत तर दिलेच सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. यानंतर त्यांच्या या विजयी मेळाव्यावर आता भाजपकडून जोरदार हल्लाबोल केला जातोय. या मेळाव्यावर मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील जहरी टीका करताना 'जिहादी सभा' असा उल्लेख केला. त्यावरून आता वाद सुरू झाला असून यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
विजयी मेळाव्याची मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत असतानाच नितेश राणे यांनी टीका केली होती. त्यांनी ठाकरे बंधूंचा हा मेळावा म्हणजे 'जिहादी सभा' असल्याचे म्हटले होते. यावर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना, छोट्या पोरांकडे लक्ष द्यायचं नसतं, बेटा काय बोलायचं ते बोलून घे, असा टोला लगावला आहे.
नितेश राणे यांनी केलेल्या टीकेवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी देखील टीका केलीय. त्यांनी, नितेश राणे हे काल-परवा हिंदू झालेले आहेत. 2014 च्या आधी ते जिहाद्यांची टोपी घालून फिरायचे. ज्या माणसांनी त्यांना निवडून आणलं, त्यांनाच ते आम्हाला मारायला सांगत आहेत. तो उद्या हिंदू लोकांना मारा असे का म्हणणार नाही. याच्यावर भरवसा ठेवू नका. आज ठाकरे बंधुवर टीका करणारा हा माणूस काल-परवा हिंदू झालेला आहे.
तसेच याच जहरी टीकेवर नितेश राणे यांच्यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी देखील हल्लाबोल केला आहे. त्यांनी, हा कधी हिंदूंचा नेता झाला? हा तर संघाला हाफ चड्डीवाला, हा कधी हिंदूंचा नेता झाला? असा टोला लगावला आहे.
दरम्यान या मेळ्याव्यात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचा उल्लेख अनाजीपंत असा करत त्यांनीच आपल्यामधील आंतरपाट दूर केल्याचे म्हटलं. आता आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठीच. पण अनेक बुवा, महाराज हे सध्या बिझी असून कुणी लिंबं कापतंय, कुणी गावाकडं जाऊन अंगारे धुपारे करतयं तर कोण रेडे कापत असेल. पण मी या सगळ्यांना एकच सांगतोय अशा सगळ्यांच्या विरोधात माझ्या आजोबांनी लढा दिला आहे. आम्ही त्यांचेच वारसदार आहोत. आज तुमच्यासमोर उभे आहोत. पण आता तुमच्या वापरा आणि फेका हे चालणार नाही. तुमच्या सारख्या नतद्रष्टांना आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला कुणी ओळखतही नव्हतं, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.