Eknath Shinde Setbeck : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, नगरसेवक सुलेखा चव्हाण अपात्र! नगरसेवकपद रद्द

Eknath Shinde Sulekha Chavan Invalid Caste Certificate : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे. नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे.महापालिका आयुक्तांनी याविषयी विभागीय आयुक्तांना पत्र पाठवले आहे.
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला बहुमत मिळाले. भाजपला सोबत घेत त्यांनी सत्ता देखील स्थापन केली. मात्र, आता महापालिकेच्या प्रभाग क्रमांक पाचमधून विजयी झालेल्या नगरसेविकेचे जात प्रमाणपत्र रद्द झाले आहे. ठाणे महापालिका प्रशासनाकडून जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने नगरसेवकपद संपुष्टात आल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक ५ अ मधील अनुसूचित जमातीच्या जागेवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार सुलेखा सुधाकर चव्हाण या विजयी झाल्या होत्या. त्यांच्या जाती प्रमाणपत्राची पडताळणी सुरू होती.

Eknath Shinde
BMC News: उद्धव ठाकरेंच्या 16 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार? विजयाला न्यायालयात आव्हान; नेमका वाद काय?

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, धुळे यांनी या जातप्रमाणपत्राची पडताळणी केली. त्यामध्ये हे प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले. त्यानंतर 16 जून 2026 रोजी हे प्रमाणपत्र रद्द केल्याचे आदेश देखील दिले. त्यांच्या या आदेशाने आता सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवक पद देखील रद्द करण्यात आले आहे.

ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दोन दिवसांपूर्वी कोकण विभागीय आयुक्तांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी १६ जून २०२६ पासून प्रभाग क्रमांक ५ अ मधील नगरसेविका पद रिक्त असल्याचे नमूद केले आहे. तसेच, या रिक्त पदाच्या अनुषंगाने नियमोचित योग्य ती कार्यवाही आपल्या स्तरावर करण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

Eknath Shinde
BMC: विशाखा राऊतांनंतर BMCच्या ७९ नगरसेवकांचाही होणार 'करेक्ट कार्यक्रम'?, कोर्टात आव्हान याचिका; पालिकेत नेमकं काय सुरुए?

ठाकरेंचे 16 नगरसेवक डेंजर झोनमध्ये

मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत या अपात्र ठरल्या आहेत. आता त्यानंतर ठाकरेंचे आणखी मुंबईतील 16 नगरसेवक डेंजर झोनमध्ये आले आहेत. या 16 नगरसेवकांच्या विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे. जात प्रमाणपत्र, संपत्तीची माहिती आणि गुन्हेगारी प्रकरणांबाबत माहिती लपवल्याचा आरोप या नगरसेवकांवर करण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Vishakha Raut Eknath Shinde Uddhav Thackeray.jpg
Dharashiv BJP, Shivsena Leader
parbhani municipal corporation; uddhav thackeray and DCM eknath shinde
Shevgaon Councillor Rizwan Shaikh
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com