Shinde's Headquarters Thane : शिंदेंच्या ठाण्यातील ऑफिसवर आजही 'बाळासाहेबांची शिवसेना'

Thane Shiv Sena Office Name : मुख्यमंत्र्यांसह कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना या गटाच्या भूमिकेत आहेत की काय, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. शिंदेंच्या ठाणे मध्यवर्ती कार्यालयावर अजूनही जुनेच नाव
Eknath Shinde Anand Ashram
Eknath Shinde Anand Ashram Sarkarnama
Published on
Updated on

Thane Loksabha News : निवडणूक आयोगाने एप्रिल 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देताना, शिवसेना हे नाव आणि चिन्ह शिंदेंच्या पारड्यात टाकले. या गोष्टीला आता नऊ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला असून, अजूनही शिंदेच्या शिवसेना ठाणे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या आनंद आश्रमावर " बाळासाहेबांची शिवसेना " असेच नाव ठळक अक्षरात दिसत आहे.

मुख्यमंत्री शिंदेंना शिवसेना हे नाव आणि चिन्ह मिळूनही " बाळासाहेबांची शिवसेना " या गटाच्या नावाच्या भूमिकेत आहेत की काय किंवा कोणीतरी शिवसेना पुसण्यासाठी कारस्थान अथवा घाट घातला तर नाही ना ? अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

तर, प्रत्येक शिवसैनिकाचे आधारवड असलेल्या आनंद आश्रमावर बाळासाहेबांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाव टाकून ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांपासून कार्यकर्त्यांना आनंद आश्रमात येण्यापासूनची दारे ही जाणूनबुजून बंद करण्यासाठी हे नाव काढलेले असावे, असेही राजकीय तज्ज्ञ मंडळींकडून बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde Anand Ashram
Mumbai Coastal Road Project : ठाकरे पिता-पुत्रावर फडणवीसांचा हल्लाबोल; म्हणाले, "बाळराजे आम्ही दुसऱ्यांच्या..."

शिवसेना ( Shivsena ) फुटीनंतर लागलेल्या अंधेरी येथील पूर्व पोटनिवडणुकीसाठी ऑगस्ट 2022 मध्ये निवडणूक आयोगाने शिवसेनेत फूट पडल्याचे मान्य करून ठाकरे आणि शिंदे या दोन गटांना वेगवेगळी नावे बहाल केली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ' आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ' बाळासाहेबांची शिवसेना ' ( Balasaheb Thackeray ) अशी त्यांची नावे होती. त्यावेळी ठाकरेंना मशाल आणि शिंदेंना ढाल तलवार हे चिन्ह दिले गेले होते, तर शिवसेना नाव आणि चिन्ह कोणाचे याबाबत एप्रिल 2023 मध्ये निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निकाल देत शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदेंना दिले.

पण, सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीमुळे ठाकरेंकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Uddhav Thackeray) हे नाव सध्या कायम ठेवण्यात आले आहे, परंतु असे असले तरी शिंदे गटाने आपले सुरुवातीचे गट म्हणून असलेले नाव अद्याप आपल्या ठाणे (Thane) मध्यवर्ती कार्यालयावरून काढले नाही. तिथे बाळासाहेबांची शिवसेना असे नाव असून, त्याखाली आनंद आश्रम तसेच एकनाथ शिंदे अशी नावे आहेत.

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले असताना त्यांच्या पक्षाने बाळासाहेबांची शिवसेना हे गटाचे नाव कायम ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवसेना फुटीनंतर ही शिवसेनेतील नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांचा ओढा हा आनंद आश्रमाकडे होत होता.

याचदरम्यान, या आश्रमात आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांनी ही हजेरी लावली होती. अशाप्रकारे आश्रमात शिवसैनिक येत होते. मात्र, आनंद आश्रमावर बाळासाहेबांची शिवसेना एवढेच नाहीतर एकनाथ शिंदे यांचे नाव लावण्यात आल्यानंतर निष्ठावान शिवसैनिकांना मात्र आनंद आश्रमात (Anand Ashram) पाय ठेवणे म्हणजे निखाऱ्यावरून चालण्यासारखेच होऊन बसले आहे. त्यामुळे नाराजी दिसून येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Eknath Shinde Anand Ashram
Ravindar Waikar: वायकरांनी ठाकरेंची साथ सोडताच कार्यकर्ते आक्रमक; फोटोला फासले काळे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com