Mumbai Coastal Road Project : ठाकरे पिता-पुत्रावर फडणवीसांचा हल्लाबोल; म्हणाले, "बाळराजे आम्ही दुसऱ्यांच्या..."

Devendra Fadnavis On Mumbai Coastal Road Project : " कोस्टल रोडची एक मार्गिका सुरू झाल्यानं प्रचंड मोठा फायदा मुंबईकरांना होणार आहे," असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
uddhav thackeray devendra fadnavis aaditya thackeray
uddhav thackeray devendra fadnavis aaditya thackeray sarkarnama
Published on
Updated on

मुंबई महानगरपालिकेच्या ( BMC ) वतीनं उभारण्यात येत असलेल्या कोस्टल रोडचं ( सागरी किनारा मार्ग ) ( Mumbai Coastal Road Inauguration ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यानंतर कोस्टल रोडची ( दक्षिण ) एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होणार आहे. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं.

uddhav thackeray devendra fadnavis aaditya thackeray
Vishal Patil News : "विश्वजित आमच्या विमानचे पायलट, नेतील तिथे जाऊ, पण...", भाजप प्रवेशावर विशाल पाटील स्पष्टच बोलले

"उबाठाच्या बाळराजेंनी सोशल मीडियावर म्हटलं की, 'कोस्टल रोडचं काम आम्ही केलं आणि आमच्या कामाचं श्रेय हे घेत आहेत.' पण, पहिल्यांदा बाळाराजेंना सांगतो की आम्ही दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेणारे नाही आहोत. जी कामं करतो, त्याचंच श्रेय आम्ही घेतो," असं फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) ठणकावून सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"कोस्टल रोडची संकल्पना अनेक वर्षांपासून होती. उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या दोन निवडणुका कोस्टल रोडच्या प्रकल्पाची मांडणी करूनच पार पाडल्या. पण, कोस्टल रोड कधी झालाच नाही," अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackeray ) केली.

uddhav thackeray devendra fadnavis aaditya thackeray
Tanaji Sawant Vs Uddhav Thackeray : 'मी अयोग्य मंत्री असेल तर उद्धव ठाकरे तुम्ही...' ; तानाजी सावंतांनी केला पलटवार!

"2004 ते 2014 राज्यात आणि केंद्रात यूपीए सरकार होतं. आपल्या नियमांमध्ये सी-लिंक बांधायला मंजुरी मिळत असे, पण कोस्टल रोडला नव्हती. मी महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्री विशेषत: यूपीए सरकारमधील शेवटच्या मुख्यमंत्र्यांना ड्रीम प्रकल्पाच्या नावाखाली दिल्लीला जाताना पाहिलं. ते दिल्लीला जायचे आणि हात हालवत परत यायचे. पण, कधीही कोस्टल रोडला परवानगी मिळाली नाही. केंद्रात मोदी आणि राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर कोस्टल रोडच्या प्रवासाला सुरुवात झाली. यासाठी केंद्र सरकारबरोबर पाच बैठका घेतल्या," अशी माहिती फडणवीसांनी दिली.

uddhav thackeray devendra fadnavis aaditya thackeray
Parbhani Loksabha Constituency : निष्ठावान बंडू जाधवांसाठी उद्धव ठाकरे परभणीला कधी येणार?

"किनारी रस्त्याची एक मार्गिका आपण सुरू करतोय, हा मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. पुढील काही काळात संपूर्ण रस्त्याचं काम करून दोन्ही मार्गिका सुरू करू. एक मार्गिका सुरू झाल्यानं प्रचंड मोठा फायदा मुंबईकरांना होणार आहे," असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

R

uddhav thackeray devendra fadnavis aaditya thackeray
Sharad Pawar News: ED हा भाजपचा सहकारी पक्ष; शरद पवारांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com