Thane Political News : भाजप आमदार गणपत गायकवाडांनी पोलिस ठाण्यातच शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकावाडांवर गोळीबार केला. आमदारांनी झाडलेल्या आठ राऊंडमधील सहा गोळ्या महेश यांना, तर दोन राहुल पाटलांना लागल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, जखमी गायकवाड आणि पाटलांवर उपचार सुरू असूनह त्यांच्या प्रकृती सुधारत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, पोलिस ठाण्यात झालेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सर्वत्र व्हायरल झाले आहे. पोलिस तपासाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेले हा व्हिडिओ बाहेर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सध्या राज्यात बिहारला लाजवेल अशी स्थिती झाल्याचा आरोप केला आहे. तसेच गोळीबार झाला त्या हिललाईन पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल करण्यामागे कोण आहे, असाही प्रश्न उपस्थित केला.
गोळीबार झाल्यानंतर महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्या कार्यकर्त्यांनी हिललाईन पोलिस ठाणे परिसात ठिय्या मांडला होता. त्यांनी गोळीबार झाला त्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली होती. त्यास पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदेंनी पोलिसांना जे काही झाले आहे, ते बाहेर येणे गरजेचे असल्याचे सांगून फुटेजची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित फुटेज प्रसारमाध्यमांना दिल्याची माहितीआहे.
दरम्यान, पोलिस ठाण्यात झालेल्या गोळीबाराला त्यापूर्वीच्या दोन दिवस झालेल्या घडामोडी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. द्वारली गावातील जाधव कुटुंब आणि आमदार गायकावाड यांच्यात वाद झाला होता. जाधव यांच्या घरातील महिलांनी आमदारांनी आमची जमीन हडपल्याचा आरोप केला होता. याबाबत महेश गायकवाड आणि आमदार गायकवाड यांच्यातील वाद विकोपाला गेला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यावर तोडगा काढण्यासाठीच महेश आणि आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) चिरंजीव वैभव हिललाईन पोलिस ठाण्यात आले होते. त्यानंतर तेथे घडलेली माहिती वैभव यांनी आमदारांना दिली. मुलाला मिळालेल्या अपमानस्पद वागवणुकीतून चिडलेले आमदार गायकवाडांनी थेट पोलिस स्टेशन गाठले आणि पुढील घटना घडल्याचे बोलले जात आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.