Sanjay Raut Dasara Melava News : `आदित्य ठाकरे आता तुम्ही लहान बाळ राहिला नाहीत`.. संजय राऊत असं का म्हणाले?

Sanjay Raut said, Aditya Thackeray, you have now become the leader of the state and the country : शिवाजी पार्कच्या मैदानावर आज आदित्य ठाकरे यांनी भाषण केले. दसरा मेळाव्यातील हे त्यांचे पहिले भाषण असल्याने ते काय बोलतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असताना त्यांनी ही सभा गाजवली.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut Speech News : शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर राज्यात दोन दसरा मेळावे भरू लागले आहेत. एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवाजी पार्कवर, तर दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गेल्यावर्षी बीकेसी तर यंदा आझाद मैदानावर. या दोन्ही मेळाव्यांकडे संपुर्ण राज्याचे लक्ष असते. शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह सगळ्याच नेत्यानी महायुती व त्यांच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले.

शिवाजी पार्कच्या मैदानावर आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाषण केले. दसरा मेळाव्यातील हे त्यांचे पहिले भाषण असल्याने ते काय बोलतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असताना त्यांनी ही सभा गाजवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवताना त्यांनी महायुतीचे सरकार घालवण्यासाठी आणि महाराष्ट्राची सुरू असलेली लूट रोखण्यासाठी मला साथ देणार का? अशी साद उपस्थितांना घातली.

आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणात, आम्ही कधी वडिलांसमोर भाषण केलं नाही, बाळासाहेबांपासून ते आजपर्यंत. पण, यंदा मी वडिलांसमोर भाषण करतोय, असे म्हटले होते. आदित्य ठाकरे यांच्या भाषणानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचे भाषण झाले. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आवाहन आणि विधानाचा उल्लेख करत राऊत यांनी ` आदित्य ठाकरे तुम्ही आता लहान राहिला नाहीत.

Sanjay Raut
Aditya thackeray : 'खेचून, रडून, ओढून-ताणून..!', आदित्य ठाकरेंनी शिंदेंसह भाजप कार्यकर्त्यांची उडवली खिल्ली

तुम्ही राज्याचे, देशाचे नेते झाले आहात`, असे म्हणत दसरा मेळाव्यातील तुमचे भाषण म्हणजे परिवर्तनाची नांदी असल्याचा उल्लेख केला. (Sanjay Raut) आदित्य ठाकरेंनी दसरा मेळाव्यात पहिले भाषण केले, ही नव्या पर्वाची सुरवात आहे. आता आपण लहान राहिला नाहीत, तुम्ही राज्याचे, देशाचे नेते झालेले आहात. महाराष्ट्र तुमच्याकडे आशेने पाहतो आहे.

महाराष्ट्र लढण्यासाठी नेहमी ठाकरेंच्याच मागे उभा राहिला आहे. तो आता तुमच्या मागेही उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रातील अंधकार दूर करण्यासाठी ही मशाल हाती घेऊन आपण निघाला आहात, अशा शब्दात त्यांच्या भाषणाचे कौतुकही केले. तसेच पुढील 2 महिन्यात या व्यासपीठावर आपण विजयी सभा घेणार असून उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, असा दावाही केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com