Kolhapur News : मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर आज तोडगा निघणार? वळसे पाटील, मुश्रीफ, राजू शेट्टींची महत्त्वाची बैठक

Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापूर विमानतळ येथे भेटून स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी सुंदर आंदोलनाबाबत चर्चा केली. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सहकारमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिल्यानंतर आज सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर संघटनांची बैठक मुंबई येथे होणार आहे. उद्या (गुरुवार) होणाऱ्या या पार्श्वभूमीवर बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

गेल्या वर्षीच्या उसाला प्रतिटन ४०० रुपये आणि यंदाच्या उसाला ३५०० रुपये दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana) गुरुवारी (ता. २३) पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार राजू शेट्टी यांची मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढला जाणार आहे. ही माहिती सहकार खात्याने दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raju Shetti
Devyani Farande : जायकवाडी पाणीप्रश्न; फरांदेंचा सरकारला सल्ला; मृत साठ्यातून पाच TMC पाणी...

काल सहकुटुंब आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी विमानतळ येथे गाठून चर्चा केली. त्यावेळी सहकारमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी ग्वाही शिंदे यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

प्रा. जालिंदर पाटील म्हणाले, ‘‘ऊसदराचा प्रश्न निकाली निघाला नाही, तर आम्ही गुरुवार (ता. २३) पासून महामार्गावर बेमुदत चक्काजाम करणार आहोत. आमच्या मागण्यांबाबत कारखाने व प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. शेतकऱ्यांचा संयम सुटत आहे. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी गतवर्षीचे एफआरपी अधिक ३०० ते ५०० रुपये दिले आहेत.

सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना जादा दर देणे का जमत नाही? सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असेल तर आम्हाला न्याय द्यावा. चुकीची आकडेवारी मांडून प्रशासनाने शेतकऱ्याची दिशाभूल केली आहे.’’ सावकर-मादनाईक, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, सागर संभूशेटे आदी उपस्थित होते.

(Edited By : Mangesh Mahale)

Raju Shetti
Ramesh Bidhuri Controversial Statement : दानिश अलींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य भाजप खासदार बिधुरींना भोवणार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com