South Central Mumbai Lok Sabha : दक्षिण मध्य मुंबईत मुख्यमंत्री, शिंदेंचे लाडके मागे पडले

Rahul Shewale vs Anil Desai Lok Sabha Election 2024 Results : दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ शिंदे आणि ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात लढत होत आहे. सुरवातीला पिछाडीवर गेलेले देसाई यांनी नंतर आघाडी घेतली.
Rahul Shewale, Anil Desai
Rahul Shewale, Anil DesaiSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : ठाकरे आणि शिंदेंच्या वर्चस्वातून अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघावर ठाकरेंची छाप पडण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार राहुल शेवाळे यांना रिंगणात उतरवले, तर ठाकरे यांनी 'सोबर' लीडर अनिल देसाई यांच्यावर विश्वास टाकला. या लढतीत सुरवातीला शिंदे यांचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आघाडी घेतला होती, मात्र नंतर ते पिछाडीवर गेले आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी आघा़डी मिळवली. विविध प्रकरणांमुळे चर्चेत आलेले शेवाळे हे एकनाथ शिंदे यांचे लाडके मानले जातात.

मुंबई व शिवसेनेचा एकछत्री अंमल राहिला आहे. शिवसेनेत फूट पडली आणि वर्चस्व कुणाचे, याबाबत प्रश्न निर्माण केले जाऊ लागले. भाजपला हेच हवे होते. मुळात भाजपच्या निशाण्यावर मुंबई महापालिका होती, म्हणजे मुंबई महापालिका जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट होते.

शिवसेनेत फूट पाडण्याचे तेही एक मोठे कारण होते. ठाकरे यांना कमकुवत केल्याशिवाय हे शक्य नाही, हे भाजपला माहीत होते. त्यामुळे शिवसेना फोडण्यात आली. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करण्यासाठी भाजपमधील नेत्यांची एक फळी कार्यरत झाली. शिंदे गटातील नेत्यांची त्याला जोड मिळाली.

अशा परिस्थितीमुळे मुंबईतील लढतींकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईकर कुणाच्या पाठिशी उभे राहणार, याची उत्सुकता राज्याला लागली होती. त्याचा निकाल आज लागल्याचे दिसून येत आहे. सुरवातीला पिछाडीवर पडलेले देसाई अखेर आघाडीवर आले. मुंबईतील बहुतांश जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे होते. मुंबईकर ठाकरे यांच्या पाठिशी उभे असल्याचे चित्र दिसत आहे. ठाकरे यांना संपवण्यासाठी भाजपने अन्य एका ठाकरेंचा वापर केला, मात्र त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे चित्र दिसत आहे. मध्यंतरी, शेवाळे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. ते त्यांना महागात पडतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Rahul Shewale, Anil Desai
Jalna Loksabha Result : जालन्यात काळेंचा रावसाहेब दानवेंना धक्का; अपक्ष मंगेश साबळे ठरणार गेम चेंजर?

गेल्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात राज्यभरात सभा घेतल्या होत्या. मोदी, शाह यांच्यावर कडाडून टीका केली होती. या निवडणुकीत मात्र त्यांनी यू टर्न घेत भाजपसोबत हातमिळवणी केली. महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांनी जाहीर सभा घेतल्या. धार्मिक ध्रुवीकरण होईल, अशी विधाने त्यांनी जाहीर सभांमध्ये केली.

निकाली निघालेला परप्रांतियांच्या मुद्द्याला पुन्हा एकदा फोडणी दिली, मात्र त्याचा ठसका महाविकास आघाडीसा बसण्या ऐवजी महायुतीलाच बसल्याचे दिसत आहे. विशेष असे, की राज ठाकरे यांच्या मनसेच्या गेल्या लोकसभा Loksabha निवडणुकीत एकही उमेदवार रिंगणात नव्हता आणि या निवडणुकीतही एकही उमेदवार रिंगणात नाही.

Rahul Shewale, Anil Desai
Nanded Lok Sabha Election Result 2024 : अशोक चव्हाणांचा नवा 'आदर्श' नांदेड धुडकावणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com