Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, "राजन विचारे नकली, तर नरेश म्हस्के आनंद दिघेंचे असली शिष्य"

Eknath Shinde On Rajan Vichare : "धर्मवीर चित्रपटात राजन विचारे स्वत:हून आले मला सभागृह नेते दिलं, हे सगळं खोटं आहे. आता..."
Eknath Shinde rajan vichare
Eknath Shinde rajan vicharesarkarnama
Published on
Updated on

Thane News, 6 May : राजन विचारे आनंद दिघे यांचे नकली शिष्य, तर नरेश मस्के असली शिष्य आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडणाऱ्यांबरोबर राजन विचारे गेले आहेत. आनंद दिघे यांना उद्धव ठाकरे यांनी कायम त्रास दिला, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील ( Thane Lok Sabha Election 2024 ) महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के ( Naresh Mhaske ) यांच्या निवडणूक नियोजनासाठी सर्व घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक सोमवारी ( 6 मे ) पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी मला एका प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला. राजकीय अस्तित्व संपवणं सोपं नाही. मी कुणाकडेही पद मागितलं नाही. आनंद दिघे यांनी मला उभं केलं. माझ्या आयुष्यात दुख:द प्रसंग आला, तेव्हा माझ्या पाठिमागे आनंद दिघे उभे राहिले. मी पालिकेचं सभागृह नेतेपद सुद्धा मागितलं नाही. पण, आनंद दिघे यांनी मला सांगितलं, 'तू सभागृह नेते पद सांभाळशील हा मला विश्वास आहे.' नंतर मला सभागृह नेते पद देण्यात आलं."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"राजन विचारे यांनी राजीनामा दिला नव्हता"

"पण, धर्मवीर चित्रपटात राजन विचारे स्वत:हून आले, मला सभागृह नेते दिलं, हे सगळं खोटं आहे. आता दुसऱ्या भागात सगळं खरं दाखवणार आहे. आनंद दिघे यांनी राजन विचारे यांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं. पण, राजन विचारे यांनी राजीनामा दिला नव्हता," असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

"बाळासाहेबांएवढी लोकप्रियता आनंद दिघेंना मिळत होती"

"आनंद दिघे यांचा असली शिष्य नरेश म्हस्के आहे. तर, नकली शिष्य राजन विचार आहेत. कारण, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडणाऱ्यांबरोबर राजन विचारे गेले आहेत. आनंद दिघे यांना त्यांनी ( उद्धव ठाकरे ) यांनी कायम त्रास दिला. त्याबद्दल आनंद दिघे कायम आम्हाला सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्याएवढी लोकप्रियता आनंद दिघे यांना मिळत होती. पण, दिघे यांना जिल्हा सोडा आणि राजीनामा द्या, असं फर्मान सोडलं होतं," असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

Eknath Shinde rajan vichare
Eknath Shinde News : 'धर्मवीर 2'मध्ये खरे-खरे दाखवून CM एकनाथ शिंदे कुणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार ?

"ठाकरेंनी दिघेंच्या संपत्तीबद्दल माहिती विचारली"

"आनंद दिघे यांचं निधन झाल्यावर मी उद्धव ठाकरे यांना भेटलो. तेव्हा मला उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या संपत्तीबद्दल माहिती विचारली. त्यावेळी मला फार चुकीच्या ठिकाणी आलो, असं वाटलं," असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

Eknath Shinde rajan vichare
Eknath Shinde News : "मी रिंगमास्टर, वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाहीत," मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com