Shinde vs Thackeray : धनुष्यबाण कुणाचा ? ; ठाकरे गटाला आज दुपारी दोनपर्यंतची मुदत; आयोगाकडून पत्र

Shinde vs Thackeray : . आयोगाच्या त्वरीत सुनावणी घेण्यास ठाकरे गटाने विरोध केला आहे.
Shinde vs Thackeray
Shinde vs Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळाव्यानंतर आता धनुष्यबाण कुणाला मिळणार, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. "आम्हीच खरी शिवसेना," असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला होता. त्याला आक्षेप घेत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीस स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे आता हे प्रकरण पुन्हा आयोगाकडेच आले आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाची लढाई सुरू आहे. आता निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला आज (शनिवार) दुपारी 2 पर्यंत मुदत दिली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना उत्तर सादर करावे लागणार आहे.या पार्श्वभूमीवर ठाकरे गट दुपारी १ वाजता निवडणूक आयोगाला भेटणार आहे. आयोगाच्या त्वरीत सुनावणी घेण्यास ठाकरे गटाने विरोध केला आहे.

ठाकरे गट निवडणूक आयोगाकडे लेखी पत्र सादर करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्वरीत सुनावणी घेण्याची विनंती केली होती. निवडणूक आयोगानं शिंदेची दखल घेऊन ठाकरेंना पत्र पाठवले आहे. तर ठाकरे गट त्वरीत सुनावणी घेण्यास तयार नाही.

Shinde vs Thackeray
Eknath Shinde : पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय..

जो पर्यंत सर्व कागदपत्रे सादर होत नाही तो पर्यंत सुनावणी घेऊ नये, असे ठाकरे गटाने म्हटलं आहे. कागदपत्रांसाठी ४ आठवडे लागणार असल्याचे ठाकरे गटाने म्हटलं आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाला विनंती करणार आहेत.

शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची ठाकरे गटाने मागणी केली होती. त्यामुळे वेळ वाढवून देण्यात आला होता. शिंदे गटाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सुमारे दीड लाख प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत, तर प्रतिस्पर्धी ठाकरे गटाने 8 ते 9 लाख प्रतिज्ञापत्रे जमा केली आहेत. पक्षातील बहुमत कोणाकडे आहे या मुद्द्याआधारे निवडणूक आयोग साधारणपणे निर्णय घेतो.

धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं तर नवीन चिन्हावर दोन्ही गटाकडून विचारविनिमय सुरु आहे. ठाकरे गटाकडून सध्या ढाल आणि तलवार चिन्ह घेण्यावर विचार सुरू आहे. तर शिंदे सेना तलवार हे चिन्ह घेण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. दसरा मेळाव्यातही एकनाथ शिंदेच्या भाषणापूर्वी एक तलवारही व्यासपीठावर आणण्यात आली होती. ही त्याची तयारी असल्याची चर्चा आहे.

अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. हे पाहता धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरते गोठवले जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग आता सुनावणी कधी घेणार? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com