Assembly Election Video : विधानसभा निवडणूक आणि निकालाची तारीख ठरली, एकाच टप्प्यात निवडणूक?

Assembly Election election commission BJP NCP Shivsena:महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही नोव्हेंबरमध्ये होईल आणि पुढील 10 ते 15 दिवसांत आचारसंहिता लागू होण्याचा अंदाज राजकीय पक्षाचे नेते व्यक्त करत होते. तो अंदाज खरा ठरण्याची शक्यता आहे.
Assembly Election 2024
Assembly Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Assembly Election News : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली 14 जणांचे पथक गुरुवारी (ता.26) मुंबईत आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा पथकाकडून घेण्यात येतो आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 15 ते 17 नोव्हेंबर मतदान तर 20 नोव्हेंबरला निकाल असेल, अशी शक्यता निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांशी देखील संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून निवडणूक एकाच टप्प्यात घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही नोव्हेंबरमध्ये होईल आणि पुढील 10 ते 15 दिवसांत आचारसंहिता लागू होण्याचा अंदाज राजकीय पक्षाचे नेते व्यक्त करत होते. तो अंदाज खरा ठरण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटच्या बैठकीत सरकारने घोषणांचा धडका लावला होता. त्यामुळे लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

Assembly Election 2024
Uddhav Thackeray: उमेदवार कोण? कोल्हापुरातील सर्व पदाधिकारी 'मातोश्री'वर

नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणूक होणार हे गृहीत धरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. भाजप पितृपक्ष संपताच आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करेल, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार

भाजप नेते, गृहमंत्री अमित शाह हे 24 सप्टेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यांनी आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये विदर्भ, मराठवाड आणि उत्तर महाराष्ट्रातील जागांचा आढावा घेतला. ते अमित शाह आता मुंबई दौऱ्यावर 1 ऑक्टोबरला येणार आहे. त्यामुळे भाजपची विधानसभेची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Assembly Election 2024
Sudhir Mungantiwar Video : "संजय राऊतांना दुसरा कामधंदाच नाही..."; मुनगंटीवारांचा हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com