Election Commission of India : आयोगाचा निकाल कधीही बायस नसतो; बावनकुळेंचा शरद पवारांना टोला

Chandrashekhar Bawankule : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून टीका करणाऱ्या विरोधकांचा समाचार
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

NCP Political News :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याकडे गेला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्षाचे नाव अजित पवारांकडे राहिल हे स्पष्ट केले आहे. यापूर्वी जे उद्धव ठाकरेंसोबत झाले तेच शरद पवारांसोबत झाले आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक आयोगावर टीका करणे योग्य नाही. निवडणूक आयोग (ECI) कधीही कुणाच्या बाजूने किंवा विरोधात निकाल देत नाही. निकाल देताना निवडणूक आयोग खूप दाखले देते, त्यामुळे या निकालाचा स्वीकार केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे.

Chandrashekhar Bawankule
Election Commission On NCP Crisis : ...अन्यथा शरद पवार गटाला अपक्ष म्हणून निवडणुका लढवाव्या लागणार!

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या टीकेचाही समाचार घेतला. विरोधात बोलणे हेच विरोधकांचे काम आहे, असे ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे अभिनंदन करत पक्ष वाढवण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

गेल्या वर्षी 2 जुलै रोजी अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा त्यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसबाबत खूप मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. हा निकाल अजित पवार यांच्या बाजूने लागला असून शरद पवारांसाठी खूप मोठा धक्का आहे. शरद पवार प्रत्येक सुनावणीसाठी स्वत: हजर राहात होते. प्रत्येक युक्तीवाद कटाक्षाने ऐकायचे. त्यामुळे जे उद्धव ठाकरेंसोबत झाले ते शरद पवार यांच्याबाबत होणार नाही, अशी एक शक्यता होती.

जरी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेले असले तरी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवारांना राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक दिलासा दिला आहे. शरद पवार यांच्या गटाला स्वतंत्र मान्यता देण्यात आली आहे शिवाय निवडणूक आयोगाला उद्यापर्यंत नवीव नाव आणि नव्या चिन्हाचा प्रस्ताव द्यावा लागणार आहे.

(Edited by Avinash Chandane)

Chandrashekhar Bawankule
Ncp Crisis : मोठी बातमी! निवडणूक आयोगाचा पवारांना धक्का, राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ अजितदादांच्या हातात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com