परमबीरसिंह यांना न्यायालयाकडून आणखी एका प्रकरणात दिलासा

अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह मुंबई दाखल झाले आहेत.
Param Bir Singh
Param Bir Singh Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) मुंबई दाखल झाले आहेत. त्यांची मॅरेथॉन चौकशी सुरू असताना आता परमबीरसिंह यांना न्यायालयाने दिलासा दिला असून, त्यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द केला आहे. आतापर्यंत त्यांच्या विरोधातील तीन अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहेत.

परमबीरसिंह यांच्या विरोधात एस्प्लेनेड न्यायालायने खंडणी प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. हे वॉरंट रद्द करावे, यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणी ते चौकशीसाठी हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्यात आला होता. या प्रकरणात पोलीस अधिकारी नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके हे आरोपी असून, त्यांना आधीच अटक झाली आहे. यात सचिन बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हाही आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करीत आहे.

परमबीरसिंह हे 25 नोव्हेंबरला मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी त्यांची गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सात तासांहून अधिक काळ चौकशी झाली होती. नंतर दुसऱ्या दिवशी ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ठाण्यातील न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या विरोधात न्यायालयाने काढलेले अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. न्यायालयाने हे वॉरंट रद्द करून परमबीरसिंह यांना दिलासा दिला होता. त्याचवेळी ठाणे पोलिसांना तपासात सहकार्य करण्यासही बजावले आहे.

Param Bir Singh
शशी थरूर ट्रोल झाले पण सेल्फी त्यांनी काढलीच नव्हती!

परमबीरसिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीसमोर हजर राहण्यास टाळाटाळ करणारे परमबीरसिंह अखेर हजर झाले. त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून या सर्व प्रकरणावर पडदा टाकला आहे. याचबरोबर समितीने परमबीरसिंहांच्या विरोधात काढलेले अटक वॉरंट रद्द केले आहे.

Param Bir Singh
संसदेतून निलंबन झालं अन् खासदार म्हणाल्या, मला खूप आनंद झालाय!

परमबीरसिंह यांनी त्यांच्या वकिलामार्फत समितीसमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. समितीसमोर सादर करण्यास माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच, कुठल्या साक्षीदाराची उलटतपासणीही मला करायची नाही, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यामुळे परमबीरसिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपातून अधिकृतरीत्या माघार घेतल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे देशमुखांना क्लिनचिटच मिळाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com