Suresh Khopde Vs Deven Bharti : मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारतींच्या नियुक्तीवर माजी IPS चा आक्षेप, छगन भुजबळांवरही गंभीर आरोप

Suresh Khopde Questions Deven Bharti Appointment : बाह्य व्यक्तीमत्व हे वजनाने छटाक वाटले तरी राजकीय क्षेत्रात त्याची किंमत अनेक टना मध्ये होती, असे देवेन भारती यांना उद्देशून खोपडे यांनी म्हटले आहे.
Deven Bharti takes charge as Mumbai Police Commissioner amid objections from ex-IPS Suresh Khopde and allegations against Chhagan Bhujbal.
Deven Bharti takes charge as Mumbai Police Commissioner amid objections from ex-IPS Suresh Khopde and allegations against Chhagan Bhujbal.sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Police : मुंबई पोलिस आयुक्तपदी नुकतीच देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित करत माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी आपल्या फेसबूकवर पोस्ट केली. देवेन भारती यांची नियुक्ती कोणत्या निकषावर झाली, असा सवाल करत त्यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील गंभीर आरोप केले.

'देवेन भारती यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नेमणूक झाली याबद्दल त्यांचे अभिनंदन. मुंबईमध्ये आम्ही सहकारी म्हणून काम केलेले आहे. मुंबई 26 /11 हल्ल्याच्या तपासात देवेन भारती यांनी मोठी कामगिरी केली असा उल्लेख वाचण्यात आला? काय कामगिरी केली?' असा सवाल खोपडे यांनी आपल्या पोस्टमध्ये उपस्थित केला आहे. तसेच 26 /11 हल्ल्याच्या वेळी भारती यांनी वेळेवर मदत पोहोचवली नसल्याचा म्हटले.

Deven Bharti takes charge as Mumbai Police Commissioner amid objections from ex-IPS Suresh Khopde and allegations against Chhagan Bhujbal.
Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thorat : पाणीप्रश्नावर विखे-थोरातांमध्ये जुंपली; संतापलेला शेतकरी म्हणाला, 'आम्हाला गोळ्या घाला...'

'जेमतेम पाच फूट उंची असलेला शाळकरी मुलगा वाटणारा हा अधिकारी थोडासा अपवाद वगळता कायम मुंबई शहरातच नोकरी करीत राहिला. बाह्य व्यक्तीमत्व हे वजनाने छटाक वाटले तरी राजकीय क्षेत्रात त्याची किंमत अनेक टना मध्ये होती.', असे खोपडे यांनी म्हटले.

'देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीची बुकीने फसवणूक केल्याचे वर्तमानपत्रात वाचले होते. हे प्रकरण हे प्रकरण पूर्णपणे प्रकाशात न आल्याने नक्की कोणी कोणाला गंडवले हे समजायला मार्ग नाही!आपल्या पत्नीला या मधून सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी देवेन भारती यांची मदत घेतली.', असा दावा खोपडेंनी

'मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात कधीही नव्हते असे स्पेशल पोलिस कमिशनर पद निर्माण केले. देवेन भारती यांची त्या ठिकाणी नेमणूक केली. आणि या प्रकरणातून देवेंद्र फडणवीस व त्यांच्या कुटुंबाची त्यांनी सोडवणूकही केली. एवढा हा देवेन भारती नावाचा अधिकारी निष्णात आहे.', असे देखील खोपडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

छगन भुजबळांवर आरोप

शरद लेवे मर्डर केस मध्ये मुख्य आरोपी उदयनराजे यांना बेड्या घातलेल्या अवस्थेत 2000 जमावा पुढे उभे करा, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाचे त्यांचे चुलते अभयसिंह राजे यांची मागणी मी मान्य केली नाही. म्हणून साताराचे पालकमंत्री अजित पवार यांचे सूचनेवरून माझी बदली तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी अकोला येथे केली होती.

अकोला येथून माझी बदली पाच महिन्याच्या आत याच भुजबळांनी केली. त्या ठिकाणी या देवेन भारती यांची नेमणूक केली. पाच तास भुजबळांच्या केबिन समोर बसून वाट पाहिली. त्यांना प्रत्यक्ष भेटून एकच प्रश्न विचारायचा होता की माझी अकोल्यावरून अशी तडकाफडकी बदली का केली? भुजबळ यांना महात्मा फुले यांच्या तत्त्वज्ञानाशी काही देणे घेणे नव्हते, असा आरोप देखील खोपडे यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे.

Deven Bharti takes charge as Mumbai Police Commissioner amid objections from ex-IPS Suresh Khopde and allegations against Chhagan Bhujbal.
NCP Jitendra Awhad : 'मंत्रालयात दलालीची नवीन पद्धत'; जितेंद्र आव्हाडांचा घणाघात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com