Dhananjay Munde : ...अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंबाबत विधानसभेत केली महत्वपूर्ण घोषणा!

Devendra Fadnavis Announcement : धनंजय मुंडे यांनी मागील आठवड्यात मंगळवारी (ता. 04 मार्च) मंत्रिपदाची राजीनामा दिला होता. मुंडे यांचा राजीनामा आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबतची घोषणा माध्यमासमोर केली होती.
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 11 March : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मागील आठवड्यात ४ मार्च रोजी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर केली होती. त्यावरून विधानसभेत मोठा गदारोळ उडाला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची घोषणा विधानसभेत करायला पाहिजे होते. विधानसभा सदस्यांना त्याबाबत माहिती देणे गरजेचे होते, असा आरोप केला होता. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी आज पुन्हा हा मुद्दा मांडताच फडणवीसांनी मुंडेंबाबतची महत्वपूर्ण माहिती सभागृहाला दिली.

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेला वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या जवळचा आहे, असे खुद्द मुंडेंनीच जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे मुंडे यांचा राजीनामा सर्वच स्तरातून मागण्यात येत होता. मात्र, चौकशीत त्यांचा संबंध अजून आढळलेला नाही, असे सांगून सत्ताधारी पक्षांकडून मुंडेंचा बचाव करण्यात येत होता.

मागील आठवड्यात देशमुख खूप्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर देशमुख यांना मारहाण झाल्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर जनभावना संतप्त झाली होती. ते लक्षात घेऊन धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची राजीनामा दिला होता. मात्र, मुंडेंनी राजीनामापत्रात आपल्या आरोग्याचा उल्लेख केला होता. मुंडे यांचा राजीनामा आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमासमोर त्याबाबतची घोषणा केली होती.

Dhananjay Munde
Budget Session : अजितदादा हे शिंदेंच्या, तर अजय चौधरी विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर बसले अन्‌ विधानसभेत जुगलबंदी रंगली!

मुंडेंच्या राजीनाम्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत करायला हवी होती, असे म्हणत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला होता. धनंजय मुंडे अजूनही मंत्री आहेत का, त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे का, असे सवाल जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, रोहित पवार यांच्यासह काँग्रेसचे आमदारही करत होते. त्यावरून विधानसभेत गदरोळ माजला होता.

दरम्यान, काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी आज पुन्हा विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला. धनंजय मुंडे यांचा जो राजीनामा झाला आहे का, ते आज मंत्री आहे की नाही, हे सभागृहाला सांगावं, एवढी आमची अपेक्षा आहे.

पटोले यांच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भातील रुलिंग मी देईन, असे सांगितले. त्याबाबत नार्वेकर बोलत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उठले आणि म्हणाले, अध्यक्ष महोदय, आपल्या रुलिंगच्या पूर्वी मी नाना पटोले यांच्या मनात काही शंका असेल तर सांगतो की, ते आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत, असे उत्तर दिलं.

Dhananjay Munde
Padalkar On Budget : गोपीचंद पडळकरांची अर्थसंकल्पावर मजेशीर प्रतिक्रिया, ‘नीट बघायला पाहिजे...त्यांनी काय घोषणा केल्या, हे मी नीट ऐकलंच नाही’

मुख्यमंत्री हे सांगताना धनंजय मुंडे यांचे नाव घेतले नाही, त्यामुळे नाना पटोले यांचे समाधन न झाल्याने ते म्हणजे कोण, असा प्रश्न केला. त्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर तुम्ही जे विचारलं ते, असे उत्तर दिलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुम्ही जे विचारलं, त्यांच्याबद्दल सांगतो. धनंजय मुंडे आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत, असे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com