निवृत्त PI ते प्रकरण विसरला नाही : अतिरिक्त पोलिस महासंचालक देवेन भारतींवर गुन्हा

देवेन भारती (Deven Bharti) हे मुंबईचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) असताना हा प्रकार घडला होता.
Deven Bharti
Deven Bhartisarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्य सुरक्षा बलाचे अतिरिक्त महासंचालक देवेन भारती (Deven Bharti) यांच्यासह दोघांवर मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१७ मध्ये एका बांगलादेशी महिलेच्या पासपोर्ट प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी भारती यांनी दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यावेळी भारती हे कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त होते.

२०१७ मध्ये आय ब्रान्चचे पोलिस निरीक्षक दीपक करूळकर यांना रेश्मा शेख या महिलेने पासपोर्टसाठी दिलेली कागदपत्रे बनावट असल्याची शंका आली. त्यांनी रेश्मा यांची चौकशी केली असता आणि कागदपत्रांवरील पत्त्यांची पडताळणी केली असता तिने सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर करूळकर यांनी मालवणी पोलिस ठाण्याला याबाबत महिलेची चौकशी करून कारवाई करण्याबाबत कळवले.

Deven Bharti
पोलिस दलात खळबळ : कधी काळी मुंबई चालविणाऱ्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा

त्यावेळी दीपक फटांगडे हे मालवणी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी करूळकर यांच्याकडून आलेल्या अर्जावर कुठलीही कारवाई केली नाही. काही दिवसांनी करूळकर यांनी चौकशी केली असता या प्रकरणात कोणतीही कारवाई करायची नाही, असे वरिष्ठांकडून सांगण्यात आल्याचे त्यांना सांण्यात आले. त्यानंतर सहआयुक्त देवेन भारती यांनी करूळकर यांना बोलावून या प्रकरणात लक्ष घालू नका, असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Deven Bharti
महाआघाडी सरकार IPS देवेन भारतीवर नाराज; सुरक्षा मंडळावर नियुक्ती 

गुप्तवार्ता विभागाकडून चौकशी

दरम्यान, करूळकर निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यांनी मालवणी पोलिस ठाण्यातून माहिती अधिकाराच्या माध्यमातून या प्रकरणातील अर्जाबाबत जाणून घेतले असता, सदर अर्ज नष्ट करण्यात आल्याचे त्यांना उत्तरात सांगण्यात आले. त्यानुसार करूळकर यांच्या मालवणी पोलिस ठाण्यातील तक्रारीवरून पोलिसांनी देवेन भारती यांच्यासह तत्कालीन पोलिस निरीक्षक दीपक फटांगडे आणि बांगलादेशी महिला रेश्मा खान यांच्यावर गुन्हा दाखल केला. मुंबई पोलिसांचा गुप्तवार्ता विभाग प्रकरणाची पुढील चौकशी करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com