Salman Khan: ही मुंबई आहे, इथे कुठलीही गँग..., सलमानच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची बिश्नोई गँगला 'वॉर्निंग'

Salman Khan House Firing Latest Update: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे बिश्नोई गँगचे असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सलमानच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बिश्नोई गँगला थेट इशाराच दिला आहे.
Eknath Shinde, Lawrence Bishnoi, Salman Khan
Eknath Shinde, Lawrence Bishnoi, Salman KhanSarkarnama

CM Eknath Shinde Meet Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाला होता. या घटनेनंतर राज्यासह देशात एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आहे. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सलमानच्या कुटुंबीयांना धीर दिला. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, असं आश्वासनही दिलं आहे.

सलमानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार झाल्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी पोलिस आयुक्तांना फोन करून सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले होते. शिवाय घटनेच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी फोन करून सलमानची चौकशीही केली होती. दरम्यान, एका फेसबुक अकाउंटवरून एका व्यक्तीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. तो लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) भाऊ असल्याचं समोर आलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासादरम्यान, गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे बिश्नोई गँगचे असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सलमानच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) बिश्नोई गँगला थेट इशाराच दिला आहे.

सलमानच्या घरी भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, हा महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे, इथे कुठलीही गँग नसून पूर्ण अंडरवर्ल्ड संपलं आहे. आम्ही बिश्नोईला खतम करू. पुन्हा कोणीही असा हल्ला करण्याची हिंमत करणार नाही, अशी कारवाई करू असा सज्जड इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. तसेच इथे मुंबई पोलिस (Mumbai Police) आहेत. हा महाराष्ट्र आहे. इथे कुणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही.

Eknath Shinde, Lawrence Bishnoi, Salman Khan
Salman Khan: सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्याने फेसबूक पोस्ट करत जबाबदारी स्वीकारली

सलमान खान तर आमचा खूप मोठा फिल्मस्टार आहे. त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आमची आहे. अशी कुणाचीही गँग इथे चालणार नाही. ज्यांना पकडलंय त्यांचा तपास सुरू आहे. मळापर्यंत तपास होईल. आरोपींवर कारवाई केली जाईल. नागरिकांची सुरक्षा करणं हे आमचं काम असून, आम्ही ते काम करणार, असं मुख्यमंत्री म्हणाले. तर याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सलमानच्या घरी भेट दिली होती.

सलमान हा तर फक्त एक ट्रेलर आहे

अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक (Facebook) अकाउंटद्वारे एका व्यक्तीने सलमानच्या (Salman Khan) घरावरील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. या फेसबुक पोस्टद्वारे सलमानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली होती. या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं, "सलमान हा तर फक्त एक ट्रेलर आहे. आम्ही हे काम केलं कारण तुला आमची ताकद समजावी, आता आणखी परीक्षा घेऊ नकोस. ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे. शिवाय पुढच्यावेळी रिकाम्या घरावर गोळ्या चालणार नाहीत," अशी धमकी फेसबुक पोस्टद्वारे देण्यात आली होती.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com