राज्यातील ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण अखेर पोचला घरी

ओमिक्रॉनचा राज्यातील पहिला रुग्ण कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सापडला होता.
Omicron Variant
Omicron VariantSarkarnama

मुंबई : ओमिक्रॉनचा (Omicron) राज्यातील पहिला रुग्ण कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सापडला होता. हा रुग्ण 33 वर्षांचा अभियंता होता. त्याचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याला घरी सोडण्यात आले असले तरी विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे.

हा रुग्ण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतून दुबई मार्गे आला होता. तो अभियंता असून तो एप्रिलपासून एका व्यापारी जहाजावर गेला होता. त्यामुळे त्याचे कोरोना लसीकरण झालेले नव्हते. त्याचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला आता रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याला सात दिवस घरीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे या रुग्णाला काल (ता.8) रुग्णालयातून सोडण्यात आले आणि कालच त्याचा वाढदिवस होता, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

दरम्यान, ओमिक्रॉन संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने वाढले पाहिजे, या दृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे. तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यात सध्या कोरोनी लशीचे 12 कोटी 3 लाख 18 हजार 240 डोस दिले आहेत. यातील 4 कोटी 37 लाख 46 हजार 512 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत तर, 7 कोटी 65 लाख 71 हजार 728 लोकांनी एक डोस घेतला आहे.

Omicron Variant
लोकप्रिय गायकाच्या काँग्रेस प्रवेशाने आमदारासह पाच नेत्यांचा पत्ता कट?

18 ते 44 वयोगटात 76.69 लोकांनी कमीत कमी 1 डोस तर 45 पेक्षा अधिक वयोगटातील 85. 25 टक्के लोकांनी एक डोस घेतलेला आहे. जगात ओमिक्रॉनच्या रुग्णात वेगाने वाढ होत असून, 54 देशात याचा प्रसार झाला आहे. फ्रान्समध्ये दैनंदिन रुग्ण 40 हजारांच्या पुढे आढळत आहेत. जर्मनीत ही संख्या 50 हजाराच्या आसपास आहे. ऑस्ट्रियामध्ये देखील कोरोना सुरु झाल्यापासून सगळ्यात मोठी लाट आली असून दररोज 7 हजाराच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत.

Omicron Variant
पर्रीकरांच्या मुलाने तिकिट मागितलं अन् भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले...

अमेरिकेत देखील नोव्हेंबर 2020 सारखी परिस्थिती उद्भवली असून दररोज एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. दक्षिण आफ्रिकेत गेल्या 2 आठवड्यात नवीन रुग्णात मोठी वाढ झाली आहे. दररोज दुपटीने रुग्ण आढळत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील काळजी घेण्याची गरज असून आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळले गेलेच पाहिजे, यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com