IPS : धिवरे, जाधव यांच्यासह पाच जणांना आयपीएस केडर

IPS : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2003 च्या बॅचचे हे अधिकारी आहेत.
Maharashtra IPS
Maharashtra IPSSarkarnama
Published on
Updated on

पुणे : भारतीय पोलीस सेवेत (IPS) यंदा महाराष्ट्रातून पाच अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2003 च्या बॅचचे हे अधिकारी आहेत.

श्रीकांत धिवरे (एसपी सीआयडी पुणे युनिट), प्रकाश जाधव (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर),  विनय राठोड (पोलीस उपायुक्त झोन 5 ठाणे शहर), अश्विनी सानप (एसपी,सिक्युरिटी कॉर्पोरेशन) आणि  रश्मी करंदीकर (एसपी नागरी संरक्षण) यांना आयपीएस दर्जा (IPS status)मिळालाआहे. हे पाचही अधिकारी 2003 च्या बॅचचे अधिकारी आहेत.

Maharashtra IPS
BJP : सुप्रियाताई, भाजपची काळजी सोडा, बारामतीची काळजी घ्या ! ; चित्रा वाघ यांचा टोला

केंद्रीय  गृहमंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. आयपीएसचा दर्जा ज्येष्ठतेनुसार मिळतो. सचोटी आणि चांगले रेकॉर्ड आणि करिअर शीटवर एकही प्रतिकूल नोंद असून चालत नाही. या अधिकाऱ्यांना हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये काही महिन्यांसाठी आयपीएस इंडक्शन कोर्स करावा लागणार आहे. त्यानंतर ते पुढील सेवत रुजू होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com