BJP Politics : भाजपने अवघ्या 24 तास गेम फिरवली! शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेविकेची घरवापसी

Anita Mukherjee Joins BJP : गेल्या काही दिवसांपासून  भाजपमधील नाराजांना हेरून त्यांचा पक्षाप्रवेश करून घेण्याचा सपाटाच शिवसेनेने लावला आहे. मात्र, त्यावर भाजपने डॅमेज कंट्रोल केले आहे.
Former corporator Anita Mukherjee after joining the BJP in the presence of party leaders, creating political ripples for Pratap Sarnaik.
Former corporator Anita Mukherjee after joining the BJP in the presence of party leaders, creating political ripples for Pratap Sarnaik.sarkarnama
Published on
Updated on

प्रकाश लिमये

Mira-Bhayandar muncipal News : उमेदवारी न मिळाल्याने मिरा रोड येथील भाजपच्या माजी नगरसेविका अनिता मुखर्जी यांनी मंगळवारी (ता.६) शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र बुधवारी (ता.७) सकाळी त्यांनी घरवापसी करत पुन्हा भाजप मध्ये प्रवेश केला.

मिरा भाईंदर महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप व शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरू आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या परंतू उमेदवारी न मिळालेल्या नाराजांची संख्या भाजप मध्ये मोठी आहे. या नाराजांवर शिवसेना बारीक लक्ष ठेवून आहे. 

गेल्या काही दिवसांपासून  भाजपमधील नाराजांना हेरून त्यांचा पक्षाप्रवेश करून घेण्याचा सपाटाच शिवसेनेने लावला आहे. अनिता मुखर्जी या मिरा रोड येथील प्रभाग १३ मधून भाजपच्या नगरसेविका म्हणून २०१७ मध्ये निवडून आल्या होत्या.  नव्या चेहेऱ्याना संधी देण्यासाठी भाजपने यावेळी अनेक माजी नगरसेवकांना पुन्हा संधी नाकारली , त्यात मुखर्जी यांचाही समावेश होता. त्यामुळे त्या नाराज होत्या.

Former corporator Anita Mukherjee after joining the BJP in the presence of party leaders, creating political ripples for Pratap Sarnaik.
Mahesh Landge Vs Ajit Pawar : 'नैराश्य..अस्वस्थ, आत्मपरीक्षण करा, तुमचा मुलगा...', महेश लांडगे अजित पवारांना नको नको ते बोलले

नरेंद्र मेहतांचा सरनाईकांना धक्का...

मंगळवारी मुखर्जी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. मात्र त्यानंतर नाट्यमय घडामोडींना वेग आला. बुधवारी सकाळी मुखर्जी यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे छायाचित्र आमदार नरेंद्र मेहता यांनी समाज माध्यमांवर प्रसारित करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे मुखर्जी यांची भाजपला सोडचिठ्ठी व चोवीस तासाच्या आत घरवापसी याची शहरात चांगलीच चर्चा सुरू होती.

Former corporator Anita Mukherjee after joining the BJP in the presence of party leaders, creating political ripples for Pratap Sarnaik.
Pune Police: गुंड गजा मारणे पोलिसांच्या रडावर: पुण्यालगतच्या गावात बसून फिरवतोय फोन, नेमका प्लॅन काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com