अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; तुरूंगातील मुक्काम वाढला

करचुकवेगिरी प्रतिबंधक विशेष न्यायालयाने देशमुखांचा जामीन अर्ज सोमवारी फेटाळला. देशमुखांना सक्तवसुली संचालनालयाने मागील वर्षी ता. 2 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे.
Anil Deshmukh bail rejected
Anil Deshmukh bail rejectedSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा आर्थर रोड तुरूंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. करचुकवेगिरी प्रतिबंधक विशेष न्यायालयाने देशमुखांचा जामीन अर्ज सोमवारी (ता. 14) फेटाळला. देशमुखांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) मागील वर्षी ता. 2 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी हा निकाल दिला.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर सचिन वाझेमार्फत 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी झालेल्या चौकशीनंतर ईडी व सीबीआयने देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर गेल्या वर्षी 2 नोव्हेंबरला ईडीने त्यांना मनी लाँर्डिंग प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणी देशमुख सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत.

Anil Deshmukh bail rejected
काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर; माजी प्रदेशाध्यक्षांनी माजी मुख्यमंत्र्यांची उडवली खिल्ली

देशमुख यांनी नियमित जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. पण हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. याबाबत अद्याप सविस्तर निकाल मिळालेला नाही. पण देशमुख यांनी अर्ज करताना आपल्याला या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा केला केला होता. ईडीने या अर्जाला जोरदार विरोध केला होता. साक्षीदार व पुराव्यांशी छेडछाड केली जाण्याची शक्यता ईडीने व्यक्त केली होती.

दरम्यान, करचुकवेगिरी प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाकडून आरोपपत्र दाखल केल्याने डिफॉल्ट जामीन मंजूर करावा, अशी मागणी देशमुखांनी नुकतीच विशेष न्यायालयाकडे केली होती. यासाठी देशमुखांनी 4 जानेवारीला विशेष न्यायालयात अर्ज केला होता. ईडीने त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केल्याने जामीन मिळावा, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली.

देशमुख हे गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली होती. तब्बल 12 तास चौकशी झाल्यानंतर त्यांना त्याचदिवशी अटक झाली होती. तेव्हापासून ते तुरूंगात आहेत. कर चुकवेगिरी प्रकरणातही देशमुखांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांच्याविरोधात तब्बल 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com