Fadnavis on Parambir Sinh: परमबीर सिंहांचं निलंबन सरकारने मागे का घेतलं? गृहमंत्री फडणवीसांनी सांगितलं कारण...

Parambir Sinh Suspension News: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मोठा दिलासा
Devendra Fadnavis on Param Bir Singh
Devendra Fadnavis on Param Bir Singh Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं होतं.

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी शंभर कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये परमबीर सिंह यांच्यावर खंडणीसह अन्य आरोपांखाली काही गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे परमबीर सिंह हे वादात सापडले होते.

Devendra Fadnavis on Param Bir Singh
CBI Raid On Sameer Wankhede: नवाब मलिकांसह शाहरूख खानला अडचणीत आणणाऱ्या समीर वानखेडेंच्या घरावर सीबीआयचे छापे!

आता परमबीर सिंह यांचे निलंबन शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतले आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, परमबीर सिंह यांचे निलंबन सरकारने मागे का घेतले? याबद्दलचे कारण राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगतिले आहे.

फडणवीस म्हणाले, "परमबीर सिंह यांच्याबद्दल 'कॅट'ने एक निर्णय दिला आहे. त्यामध्ये परमबीर सिंह यांची विभागीय चौकशी चुकीची ठरवत ती बंद करण्याचा निर्णय दिला आहे. याबरोबरच परमबीर सिंह यांच जे निलंबन करण्यात आलं होतं, तो निर्णय देखील मागे घेण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे त्यानुसार राज्य सरकारने त्यांच्या निलंबनाना निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे", असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis on Param Bir Singh
Parambir Sinh on Suspension News: परमबीर सिंहांचं काहीच नुकसान नाही; निलंबन काळातली सेवा गृहीत धरणार !

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप परमबीर सिंह यांनी केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर त्यांना काही दिवस तुंरूगातही जावं लागलं होतं.

यावेळी परमबीर सिंह यांच्यावरही काही गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे ते वादात सापडले होते. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंह यांच निलंबन केलं होतं.

(Edited By : Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com