मुंबई लोकल सुरू करण्याबाबत ४० संशोधकांचे सरकारला पत्र

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनलॉकडाउन-४ च्या मार्गदर्शक सूचनांनंतर अनेक समस्या कायम असून सरकारने याचा फेरविचार करून सुधारित आदेश जाहीर करावा, अशी मागणी या संशोधकांनी केली आहे. आयआयटी मुंबई, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बंगळुरू, आयआयटी दिल्ली, आयआयटी कानपूर आदी नामांकित संस्थांतील ४० संशोधकांनी एकत्र येऊन सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत
Researchers demand Resumption of Local Trains in Mumbai
Researchers demand Resumption of Local Trains in Mumbai
Published on: 
Updated on: 

मुंबई  : मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करावी, अशी मागणी देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांतील ४० संशोधकांनी केली आहे. सुरुवातीला लोकल ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. खाजगी किंवा विमान वाहतूक सुरू करून काही साध्य होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनलॉकडाउन-४ च्या मार्गदर्शक सूचनांनंतर अनेक समस्या कायम असून सरकारने याचा फेरविचार करून सुधारित आदेश जाहीर करावा, अशी मागणी या संशोधकांनी केली आहे. आयआयटी मुंबई, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बंगळुरू, आयआयटी दिल्ली, आयआयटी कानपूर आदी नामांकित संस्थांतील ४० संशोधकांनी एकत्र येऊन सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत. 

देशातील सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे गोरगरिबांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. हा प्रकार रोजगार काढून घेण्यासारखा असल्याची टीकाही या पत्रात संशोधकांनी केली आहे. याचबरोबर लांबलेल्या लॉकडाउनच्या काळात लहान मुलांच्या कुपोषणाच्या प्रमाणातही वाढ झाली आहे, तर या कालावधीत अनेक नवीन आजरांना आमंत्रण देण्यात आले आहे. याचबरोबर लहान मुलांचे लसीकरण, महिलांचे आरोग्य, हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, टीबीसारख्या आजारांमध्येही वाढ झाल्याकडेही या संशोधकांनी लक्ष वेधले आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक उदाहणार्थ लांब पल्ल्याच्या गाड्या व लोकल सेवा तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी या संशोधकांनी केली आहे.
Edited By- Amit Golwalkar
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.