Maharashtra Politics : 'ईडी, सीबीआयची भीती म्हणून एकनाथ शिंदेंनी टांगा पलटी...', फडणवीसांच्या विश्वासू मंत्र्याने डिवचले

Ganesh Naik Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदेचा टांगा पलटीच नाही तर घोडे फरार नाही लापता करेल, असे आव्हान देखील गणेश नाईकांनी दिले आहे.
Devendra Fadnavis-Eknath Shinde
Devendra Fadnavis-Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Ganesh Naik News : 2022 ला आम्ही बंड करून उद्धव ठाकरेंचा टांगा पलटी केला, असे म्हणत जाहीर सभांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत असतात. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी शिंदेंना डिवचले आहे.

'

तुम्ही ईडीच्या भीतीमुळे टांगा पलटी केला. स्वतःच्या तत्वासाठी नाही केला. टांगा पालटी केला आतामध्ये (तुरुंगात) जाण्याचा जो धोका होता तो टाळण्यासाठी.', असे म्हणत नाईकांनी शिंदेंना डिवचले

तुम्ही टांगा पलटी केला म्हणता मी तुमचा टांगा पलटी आणि घोडे फरार नाही लापता करेल, असे आव्हान देखील नाईकांनी शिंदेंना दिले.

कल्याणचा खासदार भाजपचा होईल

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं तर कल्याणचा आणि ठाण्याचा खासदार देखील भाजपचा होईल. एकनाथ शिंदे म्हणतात की एकनाथ शिंदेंना हलक्यात घेऊ नका पण गणेश नाईकांला हलक्यात घेऊन तुम्ही चूक केली, असे देखील नाईक म्हणाले.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Uddhav Thackeray Nashik : देवयानी फरांदे रडल्या, त्यांना रडू आवरेना.. उद्धव ठाकरेंनी जागवल्या कटू आठवणी

देसाईंचा नाईकांवर पलटवार

2022 ला आम्ही शिंदेंसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यांचा टांगा पलटी केला त्यामुळे गणेश नाईक मंत्री झाले. शिंदेसाहेबांचा टांगा पलटी करण्याचा गोष्टी लांब राहिल्या, आम्ही कार्यकर्तेच नाईकांचा टांगा पलटीच नाही तर फरार करू, असे आव्हान शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Chandrakant Patil: पिंजरा ते नटसम्राट! दोन्ही पाटलांमध्ये जुंपली; जयंतरावांची अवस्था नटसम्राटासारखी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com