
Satara News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा आहे.काही दिवसांपूर्वीच शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे महायुतीतील निधीवाटपावरुन तक्रार केल्याची चर्चा होती.अशातच आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अचानक त्यांचं मूळ दरेगाव गाठलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते नाराज असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील दरेगावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसांसाठी मुक्कामी असणार आहेत. मुंबईहून हेलिकॉप्टरद्वारे बुधवारी(ता.16) पाच वाजता दरे येथे दाखल झाले. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी लता शिंदे याही आहेत. एका घरगुती कार्यक्रमासह ग्रामदैवताची पूजा करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा हा दौरा असल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे हे नाराज असल्यानंतर दरे गावी येत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात एकीकडे राजकीय घडामोडींना एवढा वेग आला असताना कामाच्या व्यापातून शिंदे हे त्यांच्या दरेगावी मुक्कामासाठी पोहोचले आहेत.पण त्यांचा हा खासगी दौरा असणार आहे.
अमरावती विमानतळ उद्घाटन कार्यक्रम झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाले. तिथून ते थेट आपल्या सातारा (Satara) जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी रवाना झाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता.15) रात्री मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची भेट घेतली. शिंदेंनी राज ठाकरेंची अचानक भेट घेतल्यामुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता या सर्व चर्चांवर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, घरात बसून निवडणुका जिंकता येत नाहीत, असं म्हणत त्यानी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. शिंदे म्हणाले, "घरात बसून कुणालाही निवडणुका जिंकता येत नाहीत, त्यासाठी काम करणारे लोक हवेत. आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी काम करत नाही, तर नेहमीच काम करत असल्याचा दावाही शिंदेंनी यावेळी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.