Geeta Gawli : डॉन अरुण गवळीची मुलगी ‘मशाल’ पेटवणार? उध्दव ठाकरेंनी टाकला डाव, भायखळ्यात ट्विस्ट

Arun Gawli Shiv Sena UBT Milind Narvekar : भायखळा विधानसभा मतदारसंघातून गीता गवळी यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे.
Geeta Gawli
Geeta Gawli Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून गँगस्टर अरुण गवळीची मुलगी गीता गवळी या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वाढली आहे. उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकीटावर त्या निवडणूक लढू शकतात, अशा चर्चा आहे.

ठाकरेंचे विश्वासू आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गीता गवळी यांची नुकतीच त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी गीता गवळी यांच्या आई आशा गवळीही उपस्थित होत्या. दगडी चाळीतील घरी ही भेट झाल्याचे समजते. या भेटीचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असून त्यावरून भायखळ्याच्या उमेदवारीबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ शकतात.

Geeta Gawli
Shivsena UBT Vs BJP : 'उतलो, मातलो, घेतला वसा टाकला गे माय...' शेलारांनी गोंधळ गीतावरून उद्धव ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या शिवसेनेकडून गीता गवळी यांना उमेदवारीची ऑफर दिल्याची चर्चा आहे. भायखळा मतदारसंघात सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव विद्यमान आमदार आहे. त्यांच्याविरोधात गवळींना उमेदवारी दिल्यास ही लढत तुल्यबळ होण्याची शक्यात आहे. यामिनी जाधव यांनी अरविंद सावंत यांच्याविरोधात लोकसभा निवडणूकही लढवली. पण त्यात त्यांचा दारूण पराभव झाला. भायखळा मतदारसंघातही त्या पिछाडीवर होत्या.

Geeta Gawli and Milind Narvekar
Geeta Gawli and Milind NarvekarSarkarnama

गीता गवळी यांनी यापूर्वी 2019 मध्ये शिवसेनेच्या पाठिंब्यावर अखिल भारतीय सेना पार्टीकडून भायखळा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्या नगरसेविकाही होत्या.

Geeta Gawli
Gunaratna Sadavarte : आदित्य ठाकरेंविरोधात गुणरत्न सदावर्तेंनी शड्डू ठोकला, वरळीतून निवडणूक लढवणार...

अरुण गवळी सध्या शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्ये प्रकरणात जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. मागील 17 वर्षांपासून गवळी जेलमध्ये आहे. असे असले तरी अनेक भागात गवळी कुटुंबाचा दबदबा कायम आहे. त्यामुळे गीता गवळी यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढल्यास त्याचा फायदा इतर मतदारसंघातूनही होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com