Gopichand Padalkar : जालन्यातील घटनेवरून पडळकरांचा मोठा आरोप; म्हणाले...

Dhangar Reservation : फडणवीसांना धनगर आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी निवेदन
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : धनगर समाजाच्या आंदोलानस उग्र स्वरूप प्राप्त होण्यास संपूर्ण प्रशासन जबाबदार आहे. धनगर आरक्षणाबाबत असंवेदनशील असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, तर आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी धनगर नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात पडळकर म्हणाले, '७० वर्षांपासून धनगर समाज आपल्या अधिकारापासून वंचित आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश केला. मात्र, महाआघाडी सरकारने हेतुपूर्वक ‘धनगड’ आणि ‘धनगर’ असा गोंधळ निर्माण केला. आता राज्यात आपले महायुतीचे सरकार आहे. या सरकारकडून धनगर आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय होईल,' अशी अपेक्षा आहे.

Gopichand Padalkar
Sanjay Raut : देशाला 2014 पासूनच पनवती लागली; संजय राऊतांचा रोख कुणाकडे ?

दरम्यान, चौंडी येथे आरक्षण अंमलबजावणीसाठी दिलेली ५० दिवसांची मुदत संपली. त्यानंतर यशवंत सेनेच्या वतीने सुरू केलेले बेमुदत उपोषणही लेखी आश्वासनानंतर मागे घेतले. दरम्यान, राज्यभर आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धनगर समाजाने तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्याचा उपक्रम राबवला. तो सर्वत्र शांततेत पार पडला. मात्र, अधिकाऱ्यांच्या हट्टामुळे जालन्यात वेगळे वळण लागल्याचा आरोप पडळकरांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोपीचंद पडळकर म्हणाले, 'जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळांना एक दिवस आधीच माहिती दिली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी निवेदन स्वीकारले नाही. त्यांनी हेतूपूर्वक समाजाच्या भावनांकडे दुर्लक्ष केले. यातूनच धनगर आंदोलकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यासाठी सर्वस्वीपणे जालन्याचे जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. त्यांची चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई करावी.'

'पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या आदेशाने ३६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील काही व्यक्ती तर धनगर समाजातील नाहीत. काही प्रत्यक्षदर्शी ओबीसी बांधवांवरही गुन्हे दाखल केले. यातून एखाद्या सरकारी अधिकाऱ्याचा धनगर-बहुजन बांधवांवर आकस दिसतो,' असा आरोप त्यांनी केला. 'आमचा हिंसाचाराला विरोधच आहे. आता मात्र दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याचे तत्काळ आदेश द्यावेत,' अशीही मागणी पडळकरांनी केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Gopichand Padalkar
Raju Shetti News : लढ्याला यश, पण आता पोलिसांचा ससेमिरा; राजू शेट्टींसह 2500 जणांवर गुन्हा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com