Mumbai Tree Fall : चेंबूर दुर्घटनेनंतर मुंबईत आणखी एक धक्कादायक घटना; गोरेगावात नगरसेविकेच्या कार्यालयासमोरच गर्भवतीवर झाड कोसळले

Six-month pregnant woman injured after tree collapse in goregaon: गोरेगाव (पश्चिम) येथे सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेवर झाड कोसळून ती जखमी झाली. दरम्यान, सुकलेले झाड पूर्णपणे हटवले का गेले नाही, याची चौकशी करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.
BMC tree collapse incident Mumbai
BMC tree collapse incident MumbaiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai monsoon tree fall news: मुंबईतील चेंबूर येथे स्कूल बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गोरेगाव (पश्चिम) येथे आणखी एक झाड कोसळण्याची घटना घडली.

हनुमाननगर परिसरात बुधवारी दुपारी सहा महिन्यांच्या गर्भवती मनाली शेलार (26) यांच्यावर झाड कोसळून त्या जखमी झाल्या. त्यांच्यावर कूपर रुग्णालयाच्या सर्जिकल अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून डॉक्टरांनी गर्भातील बाळ सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.

मनाली शेलार या प्रसूतीसाठी मुंबईतील (Mumbai) गोरेगाव येथील प्रसूतिगृहात नोंदणी करून मोठ्या बहिणीसोबत घरी परतल्या होत्या. त्यांच्या आई संध्या लोलगे यांच्या माहितीनुसार, मोठी मुलगी दुचाकी पार्क करत असताना मनाली रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. त्याच वेळी अचानक झाड कोसळून त्या त्याखाली दबल्या.

मनाली यांचे पती अक्षय शेलार यांनी सांगितले की, अपघातात (Accident) त्यांच्या पत्नीच्या डोक्याला, खांद्याला, पाठीला, कंबरेला आणि गुडघ्याला दुखापत झाली असून झाड कोसळताच त्या काही काळ बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांनी पालिकेवर निष्काळजीपणाचा आरोप करत, झाड अर्धवट तोडून तसेच सोडल्यामुळे हा अपघात घडल्याचा दावा केला.

BMC tree collapse incident Mumbai
School Bus Tree Fall : चेंबूर स्कूल बस दुर्घटना : 11 वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी 7 लाख दंडाची शिफारस; महापालिकेच्या अजब अहवालावर सर्वपक्षीय आक्षेप

दरम्यान, कूपर रुग्णालयाच्या कार्यवाह अधिष्ठाता डॉ. मनीषा खरे यांनी सांगितले की, जखमी महिलेची सोनोग्राफी आणि एमआरआय करण्यात आला आहे. त्यांच्या खांद्याला आणि कंबरेला दुखापत झाली असली तरी कोणतेही फ्रॅक्चर आढळले नाही. त्यांची प्रकृती स्थिर असून गर्भातील बाळ सुरक्षित आहे.

BMC tree collapse incident Mumbai
JNPA Port Accident : JNPA बंदरात चक्रीवादळाचा तडाखा; टर्मिनलवरच्या कंटेनरसह तीन कामगार हवेत उडाले, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

नगरसेविकेच्या कार्यालयासमोरच अपघात

मनाली यांचे भाऊ प्रणय लोलगे यांनी सांगितले की, संबंधित झाड हे वॉर्ड क्रमांक 56 मधील नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पक्ष कार्यालयासमोर होते. त्यामुळे परिसरातील धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष झाल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

पालिकेकडून चौकशीचा आदेश

या घटनेनंतर प्रभाग समिती अध्यक्षा श्रीकला पिल्लै यांनी सुकलेले झाड पूर्णपणे हटवण्यात आले नव्हते का, याची चौकशी करण्याचा आदेश संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांना दिले आहेत. चौकशीत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com