Gulabraao Patil: संजय राऊत यांना योग्य वेळी चूना लावू; गुलाबराव पाटलांचा टोला

Maharashtra Political crises| Gulabrao Patil| आम्हाला जे मिळालं त्यात शिवसेना प्रमुखांचा हात आहे पण त्यात आमचाही काहीतरी त्याग आहेच ना
Gulabrao Patil news, Sanjay Raut News, Shivsena News, Maharashtra Political Crisis News
Gulabrao Patil news, Sanjay Raut News, Shivsena News, Maharashtra Political Crisis News

मुंबई: गेल्या आठ दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षातील घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh koshyari) यांनी गुरूवारी बहूमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश दिले आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह गुवाहाटीत असलेले सर्व 49 आमदार गुरूवारीच मुंबईत येणार आहेत. त्याआधी या सर्व आमदारांना बुधवारी गोव्यात आणले जाणार असल्याचे समजते.असे असताना आता दूसरीकडे गुवाहाटीत असलेल्या बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीकांचा गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला आहे. (Gulabrao Patil news in Marathi )

काय म्हणाले गुलाबराव पाटील ?

''आपण इथे कसे कसे आलो, हे मला सांगण्याची गरज नाही. हे सर्व सुरु असताना जिल्ह्यात मतदारसंघात आपल्यावर अनेक टीका टीप्पण्या होत आहेत. पण बरेच लोक आपल्या पाठिशीही उभे आहेत. आपल्यावर अनेक टीका झाल्या, तुमची प्रेत काढू घेऊन, तुमचे बाप किती, पण आमच्या जीवनाचा संघर्ष बोलणाऱ्यांना माहिती नाही. शिवसेना प्रमुख्यांच्या आशिर्वादाने आपण या पदापर्यंत पोहचलो आहोत. पण हे बाळासाहेबांचे फोटो लावून मोठी झालेले आहे.

Gulabrao Patil news, Sanjay Raut News, Shivsena News, Maharashtra Political Crisis News
बहुमत चाचणी होणार? सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद; पाच वाजता होणार फैसला

पण आपण बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन क्रिया केलेल कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आपल्याला मोठं करण्यात ८० टक्के जरी संघटनेचा हात असला तरी २० टक्के त्यात आपलेही कष्ट आहेत. संजय राऊत यांनी जळगावमध्ये ४७ डिग्री तापमानात ३५ लग्न लावावीत मी त्यांना ७२ समजून घेईल. त्या काळात आम्हीच लग्न लावतो. ज्यावेळी रात्री १२ वाजता कोणाला रक्ताची गरज पडते, त्यावेळी आमचा मोबाईल सुरु असतो. कार्यकर्त्यांच लग्न असेल, दु:ख असेल, वा मरण असेल तिथे आम्ही असतो.

ज्यावेळी मैदानात उतरु त्यावेळी आपण ३९ आणि ११-१२ अपक्ष आमदार त्यांच्यावर भारी पडू. त्यांनी वर्षा बंगला सोडला, सर्व सोडलं पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाही. मग आम्ही काहीच केलं नाही का त्यांच्यासाठी, ज्यावेळी आमची परिस्थिती चांगली नव्हती त्यावेळी आम्ही काय काय नाही केलं त्यांच्यासाठी, आम्हाला जे मिळालं त्यात शिवसेना प्रमुखांचा हात आहे पण त्यात आमचाही काहीतरी त्याग आहेच ना,आम्ही आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवून काम केलेले लोक आहोत. आयत्या बिळात नागोबा वाले लोक नाहीत आम्ही, मला पुन्हा टपरीवर पाठण्याची संजय राऊत भाषा करतात, पण चुना कसा लावायचा हे माहिती नाही त्याला अजून, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

पण आमची स्टोरी संजय राऊतांना सांगितली तर १९९२ च्या दंगलीत आम्ही तीघं भाऊ आणि आमचा बाप जेल मध्ये होतो. त्यावेळी संजय राऊत कुठे होते ते माहिती नाही, कलम ५६ काय असतं, ३०२ काय असतं हे संजय राऊतांना माहिती नाही. दंगलीच्या वेळेत पायी चालण काय असतं हे संजय राऊतांना माहिती नाहीत, तडीपार काय असतं हेही संजय राऊतांना माहिती नाही, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com