Solapur Kunbi Certificate : सोलापुरातील करमाळ्यात ५९९, तर माढ्यात २४२ मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप

Maratha Reservation News : दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा तालुक्यातील एकानेही कुणबी प्रमाणपत्रासाठी दावा केलेला नाही.
Solapur Kunbi Certificate
Solapur Kunbi Certificate Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील ८७५ जणांना जानेवारी २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या २२ महिन्यांत कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. करमाळा आणि माढा तालुक्यांत सर्वाधिक मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झाले असून, दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा तालुक्यातील एकानेही कुणबी प्रमाणपत्रासाठी दावा केलेला नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. (Maratha Reservation : 875 Marathas from Solapur district got Kunbi certificate)

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसून राज्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. ज्यांच्याकडे त्यासंदर्भातील पुरावा आहेत, अशांना कुणबीचे दाखले देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी शोधण्यासाठी राज्यातील महसूल यंत्रणा युद्ध पातळीवर कामाला लागली आहे. तत्पूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील ८७५ मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Solapur Kunbi Certificate
Gram panchayat Result : नगर जिल्ह्यात भाजपच नंबर वन... 90 पेक्षा जास्त ग्रामपंचायती जिंकल्याचा जिल्हाध्यक्षांकडून दावा

सोलापूर जिल्ह्यातील ८८९ मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्राची गेल्या २२ महिन्यांत अर्जाद्वारे मागणी केली होती. त्यापैकी ८७५ मराठ्यांचे अर्ज प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले आहेत. त्रुटींमुळे १२ जणांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत, तर दोघांचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. हे ८८९ अर्ज जिल्ह्यातील ९ तालुक्यांतून दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतून एकही मराठ्याने कुणबीची मागणी केलेली नाही.

ज्या व्यक्तींना कुणबी मराठा प्रमाणपत्र नाकारण्यात आले आहे किंवा अर्ज प्रलंबित ठेवण्यात आला आहे. त्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. ही संकलित झालेली माहिती राज्य सरकारकडे देण्यात येणार आहे, असे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले.

ज्यांचे कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी पुरावे मिळाले आहेत, ते स्कॅन करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाणार आहेत. जेणेकरून ते सर्वांना पाहता येतील. गावनिहाय पुराव्यांची यादीही तलाठी किंवा ग्रामपंचायत कार्यालयात लावली जाणार आहे. दवंडी देऊन गावातही यादीबाबत जागृती करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Solapur Kunbi Certificate
Gram Panchayat Results : भाजप-काँग्रेस युतीने केला बबनदादा शिंदेंच्या पॅनेलचा 'करेक्ट कार्यक्रम'...

तालुकानिहाय दाखल झालेले अर्ज व कुणबी प्रमाणपत्राचे वाटप

उत्तर सोलापूर

प्राप्त अर्ज : ३

दिलेले प्रमाणपत्र : ३

बार्शी

प्राप्त अर्ज : ११

दिलेले प्रमाणपत्र : ११

अक्कलकोट

प्राप्त अर्ज : १०

दिलेले प्रमाणपत्र : ९

नाकारलेले अर्ज : १

Solapur Kunbi Certificate
Maratha Reservation : "मराठ्यांविरोधात काही OBC नेत्यांचं षडयंत्र"; भुजबळांच्या आरोपांवर जरांगे पाटील थेट बोलले...

माढा

प्राप्त अर्ज : २४६

दिलेले प्रमाणपत्र : २४२

नाकारलेले अर्ज : ४

करमाळा

प्राप्त अर्ज : ६०६

दिलेले प्रमाणपत्र : ५९९

नाकारलेले अर्ज : ७

पंढरपूर

प्राप्त अर्ज : ३

दिलेले प्रमाणपत्र : २

प्रलंबित अर्ज : १

मोहोळ

प्राप्त अर्ज : १

प्रलंबित अर्ज : १

सांगोला

प्राप्त अर्ज : १

दिलेले प्रमाणपत्र : १

माळशिरस

प्राप्त अर्ज : ८

दिलेले प्रमाणपत्र : ८

Solapur Kunbi Certificate
Kolhapur Administration : असे काय घडले की सामाजिक कार्यकर्त्याने जल अभियंत्यांच्या घरासमोर आंघोळ केली ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com