Shivsena UBT Politics : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई CM देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, काय तरी शिजतंय?

Subhash Desai Milind Narvekar Meet CM Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री सुभाष देसाई हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगाल्यावर फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
Uddhav Thackeray Milind Narvekar  CM Devendra Fadnavis
Uddhav Thackeray Milind Narvekar CM Devendra FadnavisUddhav Thackeray Milind Narvekar CM Devendra Fadnavis
Published on
Updated on

Shivsena UBT Politics : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (सोमवारी) सकाळी भेट झाली. या भेटीवरून राजकीय चर्चांना उधान आले असतानाच उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री सुभाष देसाई हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगाल्यावर फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

उद्धव ठाकरे हे पुन्हा देवेंद्र फडणवीसांची जवळीक साधत असल्याच्या चर्चा होत्या. त्यामध्ये मिलिंद नार्वेकर आणि सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने काही तरी शिजत असल्याचा संशय राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातो आहे.

Uddhav Thackeray Milind Narvekar  CM Devendra Fadnavis
MP Vishal Patil : काँग्रेस नेतेच जयंत पाटलांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येणार, खासदार विशाल पाटलांनीच दिले संकेत

मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील असल्याने नेमकी ही भेट राजकीय कारणासाठी आहे की आणखी काही याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाजपशी जवळी साधली जात असल्याचे बोलले जात आहे.

ठाकरेंनी फडणवीसांवर टीका टाळली

उद्धव ठाकरे यांची नुकतीच मुंबईमध्ये जाहीर सभा झाली होती. या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जहरी टीका केली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख टरबूज म्हणून करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी फडणवीसांव टीका करण्याचे टाळत त्यांचा उल्लेख देवाभाऊ असा केला.

राज ठाकरेंची भेटीत काय ठरंल?

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेटीमध्ये राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांना विधान परिषद देण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यासोबतची भेट ही सदिच्छा भेट होती. त्यामध्ये कुठलही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Uddhav Thackeray Milind Narvekar  CM Devendra Fadnavis
Police Strict Action: जिल्हा पोलिस प्रमुखांनी केली कान उघाडणी, अन् खाकी झाली जागी; अंमली पदार्थ कारवाईचा धडका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com