

MLA Suresh Dhas’s Complaint Triggers Official Inquiry : राज्याच्या कृषि विभागातील कथित भ्रष्टाचाराबाबत भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या तक्रारीनंतर काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने निवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांची विशेष चौकशी समिती अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, धस यांनी त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. त्यानुसार आता धस यांच्या मनासारखे झाले असून एका IAS अधिकाऱ्यावर चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राज्य सरकारने दांगट यांची नियुक्ती करताना एक महिन्यांत कृषी आयुक्तांकडे चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. विशेष चौकशी अधिकारी म्हणून २४ जून रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण धस यांनी महिनाभरातच त्यांच्याऐवजी डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्याची मागणी सरकारकडे केली होती.
धस यांच्या मागणीवर सरकारने आतापर्यंत कोणताही निर्णय घेतला नव्हता. पण आता एका आयएएस अधिकाऱ्यांकडे ही चौकशी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दांगट यांनीच चौकशी अधिकारी म्हणून केलेली नेमणूक रद्द करण्याची विनंती सरकारकडे केली होती. त्यांनी १४ ऑगस्ट रोजीच तसेच पत्र दिले होते.
अखेर राज्य सरकारने दांगट यांची विनंती मान्य केली असून त्यांच्याऐवजी विशेष चौकशी अधिकारी म्हणून यशदाचे महासंचालक निरंजन कुमार सुधांशू यांची नियुक्ती केली आहे. कृषि विभागातील विविध योजनांमधील गैरव्यवहार तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी बेकायदेशीरपणे सुरू केलेल्या कृषि निविष्ठा व उत्पादक कंपन्या आणि विक्री केंद्रे याबाबत सुरेश धस यांच्या तक्रारी त्याचप्रमाणे विविध योजनांमधील गैरव्यवहारांबाबत प्राप्त गंभीर तक्रारींची चौकशी निरंजन कुमार सुधांशू करतील.
सर्व चौकशी प्रकरणातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना विशेष चौकशी अधिकारी चौकशीसाठी बोलावू शकतात. चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्यांनी चौकशीस उपस्थित राहणे तसेच, विशेष चौकशी अधिकाऱ्यांनी मागितलेली माहिती उपलब्ध करून देणे बंधनकार राहील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.