

Pune : '' ज्यांना ज्यांना माझ्यासोबत मैत्री करायची आहे, त्यांच्यासाठी माझे दरवाजे मोकळे आहेत. माझे दरवाजे सगळ्यांसाठीच मोकळे आहेत. मग ती राजकीय मैत्री असेल किंवा वैयक्तिक असेल. भाजपसाठीही आमचे दरवाजे कायम उघडे असल्याचे सूचक विधान करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे.
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुंबईत रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इंडियाच्या बैठकीसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आंबेडकर म्हणाले, फ्रेंडशिप डे निमित्त एक पोस्ट केली होती. पण माझे दरवाजे सगळ्यांसाठीच मोकळे आहेत. मग ती राजकीय मैत्री असले किंवा वैयक्तिक असेल. भाजप घरी चहा प्यायला आला तर त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत. पण, राजकीय नाही असेही आंबेडकर यावेळी स्पष्ट केले.
'' आणखी बॉम्ब फुटो किंवा न फुटो...''
वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यातील भेटीच्या चर्चांवर देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पाटील - शाह यांची भेट झाल्याची चर्चा आहे. मात्र, काही बॉम्ब फुटणार आहेत हे मी आधीच सांगितले होते. ते फुटले. आता त्यात काही चार्म राहिलेला नाही. आणखी बॉम्ब फुटो किंवा न फुटो जे सांगितले होते ते घडले असे आंबेडकर म्हणाले.
कुणी कुणासोबत मेळावा घ्यावा हे त्यांचे तेच ठरवतील...
यावेळी ऑगस्टमध्ये मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीत वंचित बहुजन विकास आघाडी सहभागी होणार का यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. आम्हाला बोलवायचे की नाही हे उद्धव ठाकरे, सोनिया गांधी किंवा शरद पवार यांनाच विचारा. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे संभाजी बिग्रेड यांच्यासोबत मेळावा घेत असतील तर त्यात चुकीचे काय आहे. उद्धव ठाकरे आणि संभाजी बिग्रेड यांची युती आहे. त्यामुळे कोणी कुणासोबत मेळावा घ्यावा हे त्यांचे तेच ठरवतील. हा त्यांचा प्रश्न आहे असेही आंबेडकर यांनी सांगितले.
नेमाडे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी महाराष्ट्रातील सतीची पहिली प्रथा बंद करण्याचे काम औरंगजेबाने केले असल्याची खळबळजनक विधान केलंय. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, याचे उत्तर इतिहासकारांनीच द्यावे. नेमाडे हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी असे विधान केले असेल तर त्यांना काही इतिहास ठाऊक असेल म्हणून त्यांनी तसे मांडले असावे.
महाराष्ट्रात कोणाला वाद हवा आहे?
औरंगजेब याच्यावरून राज्यात वाद सुरु झाला. मात्र, कुणी वाद केला असा थेट सवाल त्यांनी केला. मी मजारीवर गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शांतता झालेली आहे. त्यामुळे लोक कोणाच्या बाजूने आहेत हे ओळखा. कुणी काही तरी टिम टिम टिमकी वाजवत असतात. ते आरएसएस किंवा भाजपचे लोक आहेत. महाराष्ट्रात कोणाला वाद हवा आहे? असे ते म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.