Jayant Patil News : '' फडणवीसांच्या सांगण्यावरून भिडे जरांगेंना भेटायला गेले असतील तर...''; जयंत पाटलांचं मोठं विधान

NCP Political News : '' संभाजी भिडे यांच्यावर मी यापूर्वीही भरपूरवेळा बोललेलो आहे...''
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा मंगळवारी १५ वा दिवस आहे. राज्य सरकारचा आरक्षणाविषयीचा महत्त्वाचा जीआर, मुख्यमंत्र्यांची आश्वासने आणि अनेकदा शिष्टमंडळे पाठवूनही मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले नाही. पण, मंगळवारी अंतरवाली सराटी येथे संभाजी भिडे हे जरांगे पाटलांच्या भेटीला गेले. त्यांनी चर्चा केल्यानंतर जरांगे पाटलांनी सरकारला एक संधी देताना महिन्याभराचा अवधी दिला आहे. भिडेंच्या शिष्टाईला यश आल्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक विधान केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील(Jayant Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणावर भाष्य केले. ते म्हणाले, संभाजी भिडे यांच्यावर मी यापूर्वीही भरपूरवेळा बोललेलो आहे.आतापर्यंत महापुरुषांविषयी केलेली वक्तव्ये ही आक्षेपार्ह आहेत. त्या ठिकाणी जाऊन काही भाषण केलं. मला असं वाटतं की, भिडे यांना जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेले नसावं. आणि जर का फडणवीसांच्या सांगण्यावरून संभाजी भिडे(Sambhaji Bhide) त्या ठिकाणी गेले असतील. तर यापूर्वी भिडेंनी जी वक्तव्य केलेली आहेत. त्याच्यामागे फडणवीस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत देवेंद्र फडणवीस लवकरच स्पष्टीकरण देतील असेही ते म्हणाले.

Jayant Patil
Sambhaji Bhide Meet Manoj Jarange : तुमच्या लढ्याला यश मिळेल, पण उपोषण मागे घ्या; संभाजी भिडेंचे मनोज जरांगेंना आवाहन

'इंडिया' आघाडीची नुकतीच मुंबईत बैठक झाली होती. यामध्ये कॉर्डिनेशन कमिटी ही स्थापन करण्यात आली होती. उद्या इंडियाची पुन्हा एकदा बैठक आहे. त्याच पार्श्वभूमीवरती मंगळवारी उद्धव ठाकरे व संजय राऊत हे पवारांना भेटण्यासाठी आले होते. महाराष्ट्रातही आमच्या महाविकास आघाडीत समन्वय राहावं या अनुषंगाने आमच्यातही समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे.

'इंडिया'(INDIA Alliance)च्या बैठकीसंदर्भात सांगायचं झालं तर लवकरात लवकर जागावाटप करण्यात यावं असं सर्वांचं मत आहे. लवकरच तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसतील. लोकसभेच्या जागा वाटपावरून कुठलाही तिढा उद्भवणार नाही. लवकरच महाराष्ट्रातलं जागावाटप हे केलं जाईल. आणि त्याच पार्श्वभूमीवर इतर राज्यातही त्या त्या राज्यातल्या पक्षानुसार हे वाटप होईल असेही पाटील म्हणाले.

''...पण जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यायला हवं ! ''

ज्या पक्षाचे खासदार हे निवडून आलेले आहेत. त्या त्या जागा सोडून इतर जागासंदर्भातलं जागा वाटपावर चर्चा होईल. जरांगे पाटलांनी आमरण उपोषण मागे घ्यावं असं सर्वपक्षीय बैठकीत एकमताने ठरलेले आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करायला वेळ लागेल. मात्र, जरांगे पाटलांनी उपोषण हे मागे घ्यायला हवं असंही ते म्हणाले.

'' अजितदादांना माझी विनंती आहे की...''

कंत्राटे दिलेली कामं ही कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करून घ्यावी. मात्र, जे काम सरकारचा आहे. ते कंत्राटदावर नेमणूक हे चुकीचा आहे, निषेधार्ह आहे. अजितदादांना माझी विनंती आहे की, कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी नेमण्याचे धोरण हे योग्य नाही.

Jayant Patil
Shahu Maharaj On Reservation: मोदीच देऊ शकतात मराठा आरक्षण : श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांचा विश्वास

'' कुणाला आवडो अगर न आवडो...''

जयंत पाटील म्हणाले, मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मला प्रश्न करणे म्हणजे रॉंग नंबर आहे. राज्यातल्या अर्थमंत्र्याला विविध विभागाच्या बैठका घेण्याचा अधिकार आहे. कारण त्यांच्याकडे अर्थ खातं आहे. दिलेला निधी हा पूरा पडतोय का, किती कमी पडतोय याचा आढावा ते घेऊ शकतात. कुणाला आवडो अगर न आवडो मात्र शेवटी अर्थ खातं असल्याने ती एक महत्त्वाची जबाबदारी देखील आहे असेही त्यांनी सांगितले.

आता किती नाराजी असली तरी सहन करावंच लागेल. आमच्या पक्षातल्या अपात्र आमदारांबाबत धोरणात्मक निर्णय हा आमच्या बैठकीत घेण्यात आला. आम्ही विचार करूनच निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पुनर्विचार करण्याची कोणतीही गरज आम्हाला वाटत नाही असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Jayant Patil
Rajan Patil News : अजित पवार सत्तेत जाताच माजी आमदार राजन पाटलांचं स्वप्नपूर्तीकडे एक पाऊल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com