Sharad Pawar : मनसे नेत्याने केला शरद पवारांच्या इच्छाशक्तीला सलाम...

Sharad Pawar : राजकारण आपल्या जागेवर पण...
Sharad Pawar Latest News
Sharad Pawar Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या आजारपणामुळे मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिराला उपस्थित राहतील की नाही याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. मात्र पवार हे थेट रुग्णालयातून राष्ट्रवादीच्या शिबीरासाठी उपस्थित राहिले. यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांचा कमालीचा उत्साह वाढला.

दरम्यान, पवारांनी आजारी असून देखील शिबिराला लावलेल्या हजेरीमुळे त्यांचं अनेक राजकीय नेत्यांनी कौतुक केलं आहे. यामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांचाही समावेश असून मनसेचे नेते आणि प्रवक्ते गजानन काळे यांनी तर पवारांच्या इच्छाशक्तीला सलामचं केला आहे.

Sharad Pawar Latest News
ऋतुजा लटकेंच्या विजयाचे खरे शिल्पकार फडणवीस..अन्यथा शिवसैनिकांचे चेहरे लटकले असते...

पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. यामुळे ते शिर्डी येथील शिबिराला उपस्थित राहतील का?, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र ते थेट रुग्णालयातून शिर्डीला आले आणि पवारांनी पुन्हा एकदा साताऱ्यातीस पावसाच्या सभेची आठवणच करुन दिली.

या वयात आणि आजारी असूनही पवारांची ही ऊर्जा पाहून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह विरोधकांनी देखील त्यांच्या कामकाजाच कौतुक केलं. त्यांच्या याच कार्यपद्धतीत कौतुक करत मनसेचे नेते गजानन काळेंनी ट्विट करत पवारांच्या इच्छाशक्तीला सलाम केला आहे.

काळे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, "राजकारण आपल्या जागेवर पण या इच्छाशक्तीला सलाम",अशा शब्दात त्यांनी पवारांच्या कार्यपद्धतीचं जाहीर कौतुक केलं आहे.

दरम्यान,पवारांनी शिबिराला दिलेल्या भेटीवर राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही भावूक फेसबुक पोस्ट करत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं होतं.

Sharad Pawar Latest News
आगरी समाजाच्या मतांसाठी आग्रह धरला तो आता का नाही?; भोईरांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले...

आव्हाड आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले की, "आज साहेब थेट इस्पितळातून निघून शिबीरामध्ये आले आणि परत निघून आता इस्पितळात दाखल झाले असतील. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत राजकारण करायच असत आणि त्या प्रतिकूल परिस्थितीची दिशा बदलून ती आपल्या दिशेने वळवायची आणि त्यावरुन मार्गक्रमण करुन त्याच्यावर विजय प्राप्त करायचा हा त्यांचा स्थायी स्वभाव. आजही तब्येत साथ देत नसताना कार्यकर्त्यांमध्ये जोम आणि उत्साह आला पाहिजे आणि तो माझ्यामुळेच येईल याची त्यांना कल्पना असल्यामुळे आज ते शिबीरामध्ये दाखल झाले.

त्यांच्या ईच्छाशक्तीला सलामच करावा लागेल. राजकारण हे 24 तास करावं लागतं. त्याच्या अधे-मधे सुट्टी घेता येत नाही. हे त्यांनी साठ वर्षे केले आणि आजही ते करीत आहेत. राजकारण हे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत करण्याचा विषय नाही. तर सकाळी 7 ते दुस-या दिवशी सकाळी 7 म्हणजे 24 तास 365 दिवस करण्याचा विषय आहे हे त्यांच्या क्रियेतून ते दाखवतात." अशी पोस्ट आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com