.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Mumbai News : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. आता लक्ष लागले आहे, ते खातेवाटपाकडे. महायुतीमधील शिवसेना गृह खात्यावर अजूनही अडून बसलेल्याचे समोर आले आहे.
त्यातून मंत्रिमंडळाचे खाटेवाटप रखडले असून, त्याचा मुहूर्त अधिवेशन संपल्यानंतर लागेल, असे सांगितले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना अर्थ खाते मिळू शकते, तर आम्हाला गृह खाते का देत नाही? असा सवाल महायुतीतील शिवसेनेकडून केला जात आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे महायुतीमधील प्रमुख भाजपची कोंडी झाली असून खातेवाटपाचा तिढा अधिकच क्लिष्ट झाला आहे.
नागपूर (Nagpur) हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अजूनही खातेवाटप झालेले नाही. अधिवेशनानंतर मतदारसंघात मागे जात असलेल्या मंत्र्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून जावे लागणार आहे. यामुळे शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये देखील नाराजी आहे. खातेवाटप कधी होणार, यावर हे मंत्री देखील आता वरिष्ठांकडे बोट दाखवत आहेत.
खातेवाटपाचा वाढलेला तिढा यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल नाही, हे स्पष्ट होत आहे. आठ दिवसापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि संबंधित मंत्र्यांचा शपथविधी झाला. महायुतीमधील मंत्र्यांच्या संख्या देखील ठरली. परंतु एकमत होऊ शकले नसल्याने खातेवाटप लांबणीवर पडले आहे.
महायुतीमधील शिवसेनेला गृह खाते हवे आहे. परंतु भाजप शिवसेनेला गृहखाते देण्यास इच्छुक नाही. यातून खातेवाटपाचा पेच कायम आहे. मंत्र्यांकडे कोणतेच खाते नसल्याने काल महायुतीच्या मंत्रिमंडळाची बैठक अवघ्या 20 मिनिटात उरकली.
महायुतीमधील खातेवाटप लांबणीवर पडल्याचे दोन कारण समोर येत आहेत. यात मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर उमटलेली नाराजी आणि ती नाराजी अधिक उफाळून येऊ नये, यासाठी महायुतीच्या वरिष्ठांकडून घेतली जात असलेली काळजी. खातेवाटप केल्यास आपल्याच पक्षातील नेत्यांच्या नाराजी समोरे जाणे टाळणे, ही महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांची रणनीती असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.