INDIA Alliance Logo : इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण पुढे ढकललं..; नेमकं काय घडलं?

Mumbai Meeting : या पक्षाचा लोगो कसा असणार याबाबत नेतेमंडळीकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे
India Alliance
India AllianceSarakarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईत होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत लोगोचं अनावरण आज करण्यात येणार होतं. पण अचानक हे अनावरण पुढे ढकलण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या या बैठकीदरम्यान इंडियाच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आलो होते. त्यामुळे राज्यासह संपूर्ण देशाला इंडिया आघाडीचा हा लोगो कसा असणार याची उत्सुकता लागली होती. दुसरीकडे, लोगो बाबत नेतेमंडळीकडून कमालीची गुप्तता पाळली जात होती.

पण नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, लोगोबाबत सर्व नेत्यांची संमती झाली नसल्याने लोगोचे अनावरण पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यामुळे तुर्तास तरी इंडिया आघाडीचा लोगोचे अनावरण होणार नसल्याचे स्पष्ट आहे.

India Alliance
Eknath Shinde: किशोर पाटलांच्या आग्रहावरून मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ जाणार पाचोऱ्यात!

विशेष म्हणजे, लोगोच्या डिझाईनसाठी देशभरात स्पर्धा घ्यावी, आणि इंडिया आघाडीचा लोगो लोकांमधून यावा, असं काही नेत्यांचं मत असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, प्रत्येक पक्षाकडे आपापले निवडणूक चिन्ह असताना, आघाडीसाठी दुसरा लोगो कशाला हवा, असाही सूर काही नेत्यांमधून उमटताना दिसत आहे. त्यामुळे आघाडीचा लोगो ठरणार की नाही, असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

सुरूवातीला, आघाडीच्या लोगोसाठी नऊ प्रकारचे डिझाईन तयार करण्यात आल्याची माहिती होती. इंडिया नाव असल्याने या लोगोमध्ये तिरंग्याचीही झलक दिसणार असल्याचे सांगितले जात होती.

India Alliance
Priyanka Chaturvedi On Modi Sarkar : संसदेच्या विशेष अधिवेशनामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या; ठाकरेंचे खासदार चतुर्वेदींची टीका

याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही भाष्य करत स्पष्टीकरण दिले आहे. इंडिया आघाडीच्या लोगोबाबत आमचा विचार सुरू आहे. सर्व नेत्यांनी लोगोबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. लोगोबाबत अद्याप काम बाकी असल्याने आजचे अनावरण पुढे ढकलण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com