Priyanka Chaturvedi On Modi Sarkar : संसदेच्या विशेष अधिवेशनामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या; ठाकरेंचे खासदार चतुर्वेदींची टीका

Priyanka Chaturvedi On Lok Sabha Session : हिंदू भावनांचा विचार न करता विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे.
Priyanka Chaturvedi On Modi Sarkar
Priyanka Chaturvedi On Modi SarkarSarkarnama

Mumbai News : मोदी सरकारने हिवाळी अधिवेशनापूर्वीच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान पाच दिवसांचे हे अधिवेशन असणार आहे. अधिवेशन ऐनवेळी गणेशोत्सवात बोलवण्यात आल्यामुळे आता यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या व खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी हे अधिवेशन बोलावणे म्हणजे हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. (Latest Marathi News)

Priyanka Chaturvedi On Modi Sarkar
Fadanvis On 'INDIA' : समन्वयकही ठरला नाही, अन् पाच नेत्यांचा पंतप्रधान पदावर दावा; फडणवीसांनी घेतला 'इंडिया'चा समाचार !

चतुर्वेदी म्हणाल्या,"चोरी चोरी - चुपके चुपके केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विशेष अधिवेशनाचा निर्णय घेतला. माझा प्रश्न हा आहे की, देशातला एक महत्त्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव आहे. खासकरून महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा हिंदू उत्सव आहे. सरकारकडून मात्र हिंदूविरोधी काम सुरू आहे, हिंदू भावनांचा विचार न करता ऐन गणेशोत्सवात विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. हिंदूंच्या भावना दुखावण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. मला विचारायचं आहे की, असं का होत आहे? कोणत्या आधारावर हा निर्णय घेतला गेला? गणेशोत्सवात हा अधिवेशन कशासाठी? हे सरकारला सांगावंच लागेल."

Priyanka Chaturvedi On Modi Sarkar
INDIA Alliance Logo : इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण पुढे ढकललं..; नेमक काय घडलं?

विशेष अधिवेशनाचे नियोजन -

मोदी सरकारने हिवाळी अधिवेशनापूर्वीच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून पाच दिवसांचे हे अधिवेशन असणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या संदर्भातील माहिती ट्विटद्वारे दिली आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वीच मोदी सरकारने हे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या अधिवेशनात नेमकं मोदी सरकार काय मोठे निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com