

Delhi News : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi यांनी पत्रकार परिषेद घेत मणिपूरच्या हिसाचाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. गांधी म्हणाले, पंतप्रधान मोदींनी संसदेत 2 तास 13 मिनिटे भाषण केले, भाषणाच्या अगदी शेवटी त्यांनी मणिपूरवर भाष्य केले. दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये आग लागली आहे. खून, बलात्काराच्या घटना घडत आहेत. असे असूनही पंतप्रधान काल सभागृहात विनोद सांगत हसत होते. हे त्यांना शोभत नाही. (Latest Marathi News)
"पंतप्रधान मणिपूरात जाऊ शकत नसतील तर किमान त्यांनी त्यावर बोलावे, भारतीय सैन्य मणिपूरमधील हे हिंसाचार 2 दिवसात थांबवू शकतात, पण पंतप्रधानांना मात्र मणिपूर पेटवायचे होते. त्यांना आग विझवायची नाही. आग लावायची आहे 19 वर्षांच्या अनुभवात मी मणिपूरमध्ये जे पाहिले आणि ऐकले ते आजच्यासारखे कधीही पाहिले नाही. 'भारत माता' हा शब्द कामकाजातून काढून टाकण्यात आला, हा देशाचा अपमान आहे,असेही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा :
पंतप्रधान किमान मणिपूरला जाऊ शकले असते, तेथील विविध समुदायांशी संवाद साधला असता. त्यांनी म्हणायला हवं होतं की, मी तुमचा पंतप्रधान आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे , पण मला पंतप्रधानांकडून असा कोणताही हेतू दिसत नाही. 2024 मध्ये मोदी पंतप्रधान होतील की नाही हा प्रश्न नाही, प्रश्न मणिपूरचा आहे. तेथील हिंसाचाराचा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.