Thane News : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे शुक्रवारी (ता.15) ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. येथे प्रचारासाठी येत असताना गुरुनानक जयंती असल्याने ते पहिल्यांदा शहरातील गुरुद्वारात दर्शनासाठी गेले होते. मात्र, तिथे त्यांना सेवकांच्या संतापाचा सामना करावा लागला. तसेच तत्काळ गुरुद्वारातून बाहेरही पडावे लागले.
ठाण्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी. नड्डा ( JP Nadda) हे ठाण्यात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतले. मात्र, त्यानंतर तिथे सत्काराचे फोटो काढण्यासाठी मध्येच थांबले. तसेच सुरक्षारक्षकांसह भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली. त्यामुळे तिथे सुरु असलेल्या कीर्तन सेवेत अडथळा निर्माण होऊ लागला. त्यामुळे तेथील सेवक चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.
गुरुनानक जयंतीनिमित्त नड्डा हे दर्शनासाठी तिथे गेले होते. पण कीर्तन सेवेत व्यत्यय येत असल्याने उपस्थितांनी नड्डा यांना बाहेर जाण्याची विनंती केली. अखेर गुरुद्वारातील सेवकांच्या संतापानंतर जे पी नड्डांसह भाजप (BJP) उमेदवार संजय केळकर, विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे , संजय वाघुले यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रचाराचा वेग वाढवला आहे. यातच महायुतीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभांचा धडाका लावला आहे. त्यातच ठाण्यातील उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारही जोरदार सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शुक्रवारी ठाण्यात आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतले. यावेळी सत्कारासाठी थांबलेले नड्डा आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांमुळे गुरुद्वारात सुरू असलेल्या कीर्तनात व्यत्यय आल्याने सेवकांनी नड्डा यांना निघून जाण्याचा सल्ला देताच, नड्डा यांना तेथून अखेर काढता पाय घ्यावा लागला.
ठाणे शहराचे महायुतीतील भाजप पक्षाचे उमेदवार संजय केळकर आणि इतरही उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांची बैठक आणि विशेष सभा घेत विजयाचा कानमंत्रही दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.